Video: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:43 IST2022-12-01T12:42:10+5:302022-12-01T12:43:14+5:30

गंगापूर येथील इसारवाडी फाटा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर वैजापूर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निदर्शनात सहभाग घेतला. 

Chakkajam movement by Shiv Sena Thackeray group in Aurangabad district | Video: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

Video: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

औरंगाबाद: शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सक्तीची वीजबिल वसुली आणि पिक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणा करण्यात आली. गंगापूर येथील इसारवाडी फाटा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर वैजापूर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निदर्शनात सहभाग घेतला. 

गंगापूर येथील आंदोलनामुळे काही वेळासाठी औरंगाबाद - नगर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. यानंतर पोलिसांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सहकार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना वाळूज पोलीस ठाणे येथे नेण्यात आले आहे. 

यासोबतच जिल्ह्यातील खुलताबादेत देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. खुलताबाद- फुलंब्री महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सक्तीची वीजबील वसुली, विमा कपंनीच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.  

Web Title: Chakkajam movement by Shiv Sena Thackeray group in Aurangabad district