शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

‘चाकण पॅटर्न’प्रमाणेच वाळूजमध्ये ‘इंडस्ट्री टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:28 AM

पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे

औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ९ आॅगस्ट रोजी करण्यात आलेल्या जाळपोळीत लहान-मोठे मिळून सुमारे ७५ उद्योगांचे नुकसान झाले आहे. ११६ कोटी रुपयांचे नुकसान उद्योग प्रक्रियेपोटी, तर ६० कोटींचे नुकसार जाळपोळ आणि तोडफोडीमुळे झाले आहे. १७६ कोटी रुपयांचे थेट नुकसान उद्योगांचे झाले असून, याचे वेगवेगळ्या पातळीवर परिणाम होत आहेत.

चाकणमधील उद्योगनगरीत जशी टोळक्यांनी तोडफोड केली होती, त्याच धर्तीवर वाळूज औद्योगिक वसाहतीत तोडफोड करण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपन्या यातून लक्ष्य करण्यात आल्या. या सगळ्या तोडफोडीमागे सूत्रधार कोण, याचा शोध घेणे वाळूज एमआयडीसी पोलिसांना जमणार काय? असा प्रश्न आहे.

६० ते ८० जणांचे टोळके प्रत्येक ठिकाणीकॅनपॅक इं प्रा.लि.आणि वोक्हार्ट कंपनीपासून तोडफोडीस सुरुवात झाली. १० मिनिटांत कंपनी बंद करा, असे सांगणारी एक टोळी ११ वाजेच्या सुमारास त्या सेक्टरमध्ये फिरत होती. त्यानंतर दुसरी टोळी दुचाकीवरून आली, त्यात बहुतांश जण स्थानिक नव्हते. काही हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद