दोन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला
By Admin | Updated: March 28, 2015 00:47 IST2015-03-28T00:23:09+5:302015-03-28T00:47:21+5:30
औरंगाबाद : कारागृहातून सुटलेल्या एका गुन्हेगाराने शुक्रवारी सकाळी मौलाना आझाद कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घुसून दोन विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

दोन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला
औरंगाबाद : कारागृहातून सुटलेल्या एका गुन्हेगाराने शुक्रवारी सकाळी मौलाना आझाद कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घुसून दोन विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली.
आदिल आवद चाऊस (१८, रा. जयसिंगपुरा) आणि मोहंमद झोएब मोहंमद हनीफ (२२, रा. मोतीकारंजा) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. याविषयी सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे यांनी सांगितले की, आदिल चाऊस हा विद्यार्थी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात तर मोहंमद झोएब बी.एस्सी. मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.
गुन्हेगार गुड्डू व त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. गुड्डूने त्याच्यावर चाकूहल्ला केला. आदिल आणि त्याचे काही मित्र उठून उभे राहताच गुड्डूने आदिलच्या पोटात चाकू खुपसला. नंतर तो तेथून पळून जाऊ लागला. सुरक्षारक्षकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनाही चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला. या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना घाटीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, गुड्डू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही एका वाहनचालकास चाकूचा धाक दाखवून लुटले होते. तसेच तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.