क्षुल्लक कारणावरून वृद्धावर चाकूहल्ला

By Admin | Updated: January 18, 2015 00:28 IST2015-01-18T00:13:36+5:302015-01-18T00:28:01+5:30

जालना : नालीचे पाणी अंगावर फेकण्याच्या कारणावरून तालुक्यातील राममूर्ती येथे राम काळुबा मगर (६०) या वृद्ध इसमावर चाकूहल्ला करून

Chakahala on old age due to trivial reasons | क्षुल्लक कारणावरून वृद्धावर चाकूहल्ला

क्षुल्लक कारणावरून वृद्धावर चाकूहल्ला


जालना : नालीचे पाणी अंगावर फेकण्याच्या कारणावरून तालुक्यातील राममूर्ती येथे राम काळुबा मगर (६०) या वृद्ध इसमावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.
राम मगर यांचे गावात सोनाजी गोपिनाथ मगर यांच्याशी नालीचे पाणी अंगावर फेकण्याच्या कारणावरून भांडण झाले. त्यावेळी वाद विकोपाला जाऊन सोनाजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राम यांच्या छातीवर चाकूने वार करून, काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी राम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Chakahala on old age due to trivial reasons