शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पडद्यामागे घडामोडी सुरु

By admin | Updated: September 11, 2014 00:06 IST

परभणी: येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता दिग्गज राजकीय मंडळी कामाला लागली आहे.

परभणी: येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता दिग्गज राजकीय मंडळी कामाला लागली आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जि.प. चे व राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले हे पद मिळविण्यासाठी जिल्ह्यातील विविध गट-तट कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी पुढील अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता विरोधी पक्षातील सदस्यही चाचपणी करु लागले आहेत. यामधूनच बऱ्याचश्या पडद्यामागील घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेली नेते मंडळी पुन्हा एकदा जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दुसरा गट अस्वस्थ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या अधिक असली तरी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे व आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या मर्जीतील व्यक्तीची अध्यक्षपदासाठी वर्णी लागू शकते. राज्यभर काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी असली तरी परभणी जिल्हा परिषदेत मात्र हेच दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोध करायचा आणि लोकसभा- विधानसभेला एकाच व्यासपीठावरुन भाषण ठोकायचे, अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम जाणवणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दिग्गजांचा ‘पाथरी पॅटर्न’ काय करेल? याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला १० दिवसांचा कालावधी राहिला आहे. या दहा दिवसांत बऱ्याच घडामोडी घडणार असून त्या जिल्ह्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नेतेमंडळी सावधपणे व या राजकारणाचा विधानसभेला कसा लाभ मिळेल, या दृष्टिकोनातून पाऊले उचलताना दिसून येत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)