छत्रपती संभाजीनगर : बुधवारपासून प्रारंभ झालेल्या पोलिस शिपाई व बॅन्डस्मन पदाच्या भरतीमध्ये चक्क बी.ई., बी.टेक, एमबीए, बी. फार्मासह एलएलबी, एमएसस्सी मध्ये प्रथम, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले तरुण आलेले पाहून क्षणभर पोलिस अधिकारी चकीत झाले. विशेष म्हणजे, ४३४१ उमेदवारांपैकी १२२१ उमेदवार उच्चशिक्षित आहेत. या आकडेवारीवरून पुन्हा एकदा शिक्षण असूनही बेरोजगारी व शासकीय नोकरीचे आकर्षण अधोरेखित झाले आहे.
शहर तसेच जिल्हा पाेलिस दलातील भरतीस बुधवारी प्रारंभ झाला. शहर पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या १५० जागांसाठी एसआरपीएफ मैदान, तर जिल्हा पोलिसांच्या ५३ पदासांठी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर शारीरिक, लेखी परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया पार पडेल. यात उंची आणि छाती मोजणीसह १०० मीटर, १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर), गोळाफेक चाचणीसाठी १०० गुण असतील. त्यापैकी ५० गुण मिळवणारे उमेदवार लेखीपरीक्षेसाठी पात्र ठरतील.
जिल्हा भरतीसाठी ४०८ पैकी १८९ उमेदवार गैरहजर-जिल्हा पोलिस भरतीसाठी बुधवारी ५९७ पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४०८ उमेदवार उपस्थित राहिले.-१२ फेब्रुवारी रोजी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी गोकुळ मैदानावर भेट देऊन प्रक्रियेची तपासणी करून सूचना केल्या.
२८ टक्के उमेदवार उच्चशिक्षितजिल्हा पोलिस भरतीप्रक्रियेत प्राप्त ४३४१ उमेदवारांपैकी १२२१ उमेदवार (२८ टक्के) उच्चशिक्षित आहेत. यात अभियंते (बी.ई. १५), बी. टेक. (१२), एमबीए (१४), बी. फार्मसी (९), एमएस्सी (२७), एलएलबी (२), एम.कॉम. (४३), बी.एसस्सी. ॲग्री (२५), बीबीए/बीसीए (२०), एम.ए. (२), बी.एसस्सी. (३६३), बी.कॉम. (१३५), बी.ए. (५५४).
नोकरीच्या अपेक्षेने विदर्भातून मराठवाड्यातप्राप्त अर्जांपैकी बहुतांश उमेदवार अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळमधून आल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. नंदुरबार (१४), नाशिक (१३८), बेळगाव (कर्नाटक सीमा-१) , भंडारा (४), साोलापूर (१८), चंद्रपूर (३), यवतमाळ (३४), वाशिम (४४), ठाणे (२), परभणी (१२३), पालघर, रायगड, सातारा प्रत्येकी २, अमरावती (२४), अकोला (२९), बुलढाणा (२४६), गोंदिया (१), कोल्हापूर (६), सांगली (५), जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, पुणे, धारशिव, धुळे असे मिळून ८७१, तर अन्य शहरांतून २०६१ उमेदवारांनी अर्ज केला आहे.
शहर पोलिस भरतीत ९४ मुले छाती, उंचीत अपात्रएसआरपीएफ मैदानावर सुरू शहर पोलिस दलाच्या १५० जागांसाठी ७६९३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांनी मैदानावर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांसाठी सूचना केल्या.-दि. ११ फेब्रुवारी रोजी एसआरपीएफ मैदानावर एक हजारपैकी ७०१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर.-९४ उमेदवार छाती, उंची मोजणीत अपात्र ठरले. तर ६०७ उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.
अडचण असल्यास येथे करा संपर्क-शहर पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अडचण जाणवल्यास मदतीसाठी ९९२३०२३३६१, ९७६६५५७५१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.-जिल्हा पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) ०२४०-२३९२१५१ किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय ०२४०-२३८१६३३ वर संपर्क साधावा.
येथे आहे राहण्याची सोय-जिल्हा पोलिसांनी उमेदवारांसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कैलास शिल्प येथे मोफत राहण्याची सोय केली आहे. उमेदवारांनी थेट तेथेच संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे.-शहर पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची एमआयटी महाविद्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या रामचंद्र हॉल व साताऱ्यातीलच आयआरबीच्या शौर्य मंगल कार्यालयात माफक दरात सोय करण्यात आली आहे.
Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, highly educated youth, including engineers and MBA graduates, are competing for police constable positions, highlighting unemployment despite qualifications. A significant 28% of applicants are highly educated, drawn by government job security, with many applicants from Vidarbha.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में पुलिस कांस्टेबल पदों के लिए इंजीनियरों और एमबीए स्नातकों सहित उच्च शिक्षित युवा प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जो योग्यता के बावजूद बेरोजगारी को उजागर करता है। आवेदकों का एक महत्वपूर्ण 28% उच्च शिक्षित हैं, जो सरकारी नौकरी की सुरक्षा से आकर्षित हैं, कई आवेदक विदर्भ से हैं।