शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:23 AM

दंगलप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली आणि मछली खडक येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.

ठळक मुद्देसेना कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध: गुलमंडी, सराफा, पानदरिबा, कुंभारवाड्यात दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दंगलप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली आणि मछली खडक येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली.११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात दंगल झाली. या दंगलीत दोन जणांचा बळी गेला तर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटकसत्र सुरू केले. मंगळवारी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बुधवारी शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान (रा.धावणी मोहल्ला) याचा या दंगलीत सहभाग असल्याचे तपासात समोर येताच, विशेष तपास पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून त्याला दिवाण देवडी येथे अटक केली.गुरुवारी सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुलमंडी, मछली खडक, दिवाण देवडी, राजाबाजार, औरंगपुरा, रंगारगल्ली आणि कुंभारवाडा येथील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. मछली खडक आणि रंगारगल्लीतील काही दुकाने मात्र सुरू होती.गुलमंडीवरील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवावी, यासाठी दहा ते बारा जणांच्या एका टोळक्याने दुकाने बंद करा, बंद करा असे व्यापाºयांना ओरडून सांगितले. यामुळे घाबरुन व्यापाºयांनी दुकाने बंद केली.शहरातील इतर भागांत व्यवहार मात्र सुरळीतशिवसेना कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुलमंडी, औरंगपुरा, मछली खडक आणि राजाबाजार, पानदरिबा, कासारीबाजार, परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. मात्र रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. दुसरीकडे पैठणगेट, सिडको- हडको, टीव्ही सेंटर, गारखेडा परिसर, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी आणि रेल्वेस्टेशन, उस्मानपुरा परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे सुरू होती. सिटी चौक, निरालाबाजार, टिळक पथ, समर्थनगर भागात दुकाने चालू होती.लच्छू पहिलवानला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमोतीकारंजा परिसरात दोन गटांत झालेली हिंसक दगडफेक व जाळपोळप्रकरणी लक्ष्मीनारायण ऊर्फ लच्छू बाबूलाल बाखरिया (४४, रा. धावणी मोहल्ला, पानदरिबा) याला गुरुवारी (दि.१७) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण वाघ यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली. मोतीकारंजा परिसरात रात्री सव्वा वाजता पेट्रोलिंग करीत असताना अप्पा हलवाई यांच्या दुकानासमोर एका दुकानास आग लागलेली दिसली. याठिकाणी पंधरा -वीस लोक आग लावून पळून गेले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. यामध्ये सुरेश नलवडे याच्या हातात धारदार कुकरी सापडली. उपरोक्त गुन्ह्यातील दहा व्यक्तींना पूर्वीच अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यात पोलिसांनी लच्छू पहिलवानला बुधवारी (दि.१६ मे) अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम १४३, १४४, ४३६, १२० (ब), १०९ (पान २ वर)

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसMarketबाजारPoliceपोलिसShiv Senaशिवसेना