शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीएसई’ बारावीचा निकाल जाहीर

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलदरम्यान घेतलेल्या बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता आॅनलाईन जाहीर केला

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलदरम्यान घेतलेल्या बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता आॅनलाईन जाहीर केला. शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली या शाळांनी निकालाच्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. बारावीच्या या निकालानंतर ‘सीबीएसई’ दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.यश जैन शाळेतून प्रथममाळीवाडा येथील जैन इंटरनॅशन स्कूलच्या (जिसा) विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील दोन्ही शाखांतून यश कमलेश जैन याने ९६ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. समीक्षा संजय शर्मा ही द्वितीय आली असून, तिला ९२.६ टक्के गुण मिळाले आहेत. यश आणि समीक्षा हे दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेतून प्राजक्ता नारायण पाटील ही ८८ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेच्या यशाबद्दल जिसाचे सचिव जितेंद्र छाजेड आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित छाजेड, प्राचार्य के. प्रशांतकुमार, जितेंद्र बुनलिया यांनी आनंद व्यक्त केला आहे. रेव्हरडेलचा शंभर टक्के निकालरेव्हरडेल शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, राधिका शेलार या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कीर्ती दास आणि अभिनंदन गुप्ता यांनी ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर श्रुती कल्याणीकर हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक पटकावला आहे. शाळेतील ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या यशाबद्दल चेअरमन राघवेंद्र जोशी, विश्वस्त संजीव शेलार, सी.पी. त्रिपाठी, नरेंद्र चपळगावकर, जयंत देशपांडे, प्रताप बोराडे, संचालक पी.व्ही. सोळुंके, प्राचार्य जयश्री गुजर, आशिष गट्टाणी तसेच शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.नाथ व्हॅली स्कूल नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून अक्षत बाकलीवाल याने ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. दर्शन गट्टाणी आणि रजत मालू यांनी ९५.४ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून मोहित कासलीवाल हा ९६.४० टक्के गुण घेऊन प्रथम आला. मेहुल मोहगावकर याने ९६.२० टक्के गुण घेतले असून तो द्वितीय, तर वरद कोल्हे याने ९६ टक्के गुण घेतले आहेत. इंग्रजी विषयात मेहुलने सर्वाधिक ९८ गुण, अर्थशास्त्र विषयात अक्षत ९९ आणि मानसशास्त्र विषयात वरदने ९७ गुण मिळवले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे. स्टेपिंग स्टोनस्टेपिंग स्टोन स्कूलने यंदाही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या शाळेच्या ८९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ५२ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी संपादन केली आहे. १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविले आहेत. रिया मुसळेने ९४.६ टक्के गुण मिळविले, ती शाळेत प्रथम आली. त्यानंतर ९४.२ टक्के गुण संपादन करून शुभम शिंदे आणि सृष्टी सिंग हे दोघे द्वितीय आले. बिझनेस स्टडीज या विषयामध्ये शालिनी राजपूत हिने सर्वाधिक ९८ गुण मिळवले आहेत. या विषयात १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. केंद्रीय विद्यालयकेंद्रीय विद्यालयाचा निशांत कदम हा ९१.४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. या शाळेचे एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १७ विद्यार्थिनी आणि २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.