शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

औरंगाबाद : आरोग्य सेवेतील डॉक्टर संपावर गेल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे.

औरंगाबाद : आरोग्य सेवेतील डॉक्टर संपावर गेल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा विस्कळीत झालेली असतानाच औरंगाबादेतील आमखास मैदान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात येणारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर १५ जुलैपर्यंत रद्द करण्यात आले आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये ओस पडली आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडलेली असतानाच आमखास मैदान येथील जिल्हा नेत्र रुग्णालयातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग बंद पडला आहे. विशेष म्हणजे ३० खाटांच्या या रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. ग्रामीण भागात जाऊन मोतीबिंदू झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात आणले जाते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे, त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही मोफत करण्यात येते. त्यामुळे या रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असते. नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनीता गोलाईत यांनी संपाच्या पहिल्या दिवशी २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. तसेच बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणीही सुरू ठेवली होती. ही बाब मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांना समजताच त्यांनी रुग्ण तपासणी बंद पाडली होती. त्यामुळे चार दिवसांपासून या रुग्णालयातील ओपीडीही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. याविषयी डॉ. गोलाईत यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, संपामुळे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने मोतीबिंदूसह जिल्ह्यातील सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आम्ही १५ जुलैपर्यंत बंद ठेवले आहे. यादरम्यान संप मिटल्यास बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येईल.