शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कॅरीबॅग बंदीचा फियास्को !

By admin | Updated: August 26, 2014 00:17 IST

आशपाक पठाण , लातूर लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ४० मायक्रॉनपेक्षा कमीच्या कॅरीबॅगच्या वापरास महापालिकेने वर्षभरापूर्वी बंदी आणली़ शहर कॅरीबॅगमुक्त करून स्वच्छ शहर,

आशपाक पठाण , लातूरलातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ४० मायक्रॉनपेक्षा कमीच्या कॅरीबॅगच्या वापरास महापालिकेने वर्षभरापूर्वी बंदी आणली़ शहर कॅरीबॅगमुक्त करून स्वच्छ शहर, सुंदर शहर करण्याचा संकल्प केलेल्या मनपा प्रशासनाच्या मोहिमेला व्यावसायिकांनी अडथळा घातला आहे़ लातूर शहरात कॅरीबॅग बंदी असली तरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर वाढला आहे़ याप्रकरणी ‘लोकमत’ने सोमवारी स्टींग केले असता बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे दिसून आले़ गणरायाच्या आगमनाला कॅरीबॅगमुक्त शहराचा संकल्प करणाऱ्या मनपाच्या मोहिमेची गतवर्षी गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली़ काही उत्साही सामाजिक संस्था, संघटना तसेच व्यावसायिकांनी कॅरीबॅग बंद करून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी ‘उद्घाटन’ करून फोटो काढून प्रसिध्दीसाठी पिशव्या तयार केल्या़ महिनाभराची मोहिम थंडावताच त्याच व्यावसायिकांनी पुन्हा कॅरीबॅगचा वापर सुरू केला आहे़लातूर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील बहुतांश फळविक्रेते, भाजीविक्रेते, किराणा दुकान, मटन मार्केट आदी ठिकाणी बंदी असलेल्या कमी मायक्रॉनच्या कॅरीबॅग वापरात आल्या आहेत़ बंदीच्या नावाखाली कॅरीबॅग विक्रेत्यांची मात्र चांदी सुरू आहे़ १० रूपयांना मिळणारे कॅरीबॅगचे पॉकेट आता २० ते २५ रूपयांना मिळते़ किरकोळ व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांना कॅरीबॅग पुरविणारी यंत्रणा बंदीनंतर कार्यरत झाली आहे़ ग्राहकांकडूनच होतो हट्ट़़़सोमवारी दयानंद गेट परिसरातील भाजीपाला बाजारात पाहणी केली असता बहुतांश भाजीविक्रेत्यांकडे कॅरीबॅग आढळून आल्या़ कॅरीबॅग असेल तर भाजी घेणार असा हट्ट ग्राहकांकडूनच होत असल्याने परवडत नसले तरी कॅरीबॅग ठेवावी लागते, असे ग्रामीण भागातून आलेल्या एका भाजीविक्रेत्या महिलेने सांगितले़ कॅरीबॅग देतो कोण, असे म्हटल्यावर दोघे-तिघे आहेत बाजारात़ त्यांच्याकडून महागात कॅरीबॅगचा पुडा विकत घ्यावा लागतो़ बरेच ग्राहक पिशवीसाठी वाद घालतात़ अगोदरच ग्राहक कमी़ त्यात पुन्हा कॅरीबॅग नाही म्हणून ग्राहक परत पाठविणे हे नुकसानीचे असल्याने कधी तरी कॅरीबॅग उपलब्ध करून द्यावी, लागते असे विक्रेत्यांनी सांगितले़ प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर वाढल्याने लातुरात विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे़ छुप्या पध्दतीने विक्री जोरात आहे़ मनपाचे पथक प्रमुख विक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याची ओरड होत आहे़ लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वर्षभरापूर्वी मनपा प्रशासनाने कॅरीबॅगबंदीचा निर्णय घेतला़ यावर सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट आदींना मोहिमेत सहभागी करून घेत जनजागृती केली़ महिनाभर झालेली जनजागृती थंडावताच पुन्हा कॅरीबॅॅगने डोकेवर काढले़ ४४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग बाजारात मिळतात़ लातुरात बंदी असल्याच्या नावाखाली विक्रेत्यांकडून दुप्पट ते तिप्पट दराने कॅरीबॅगचे पॉकेट विकले जात आहे़ मनपा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी छापे टाकून किरकोळ फळविक्रेते, भाजीविक्रेते यांच्याकडून कॅरीबॅग जमा करून मोठ्या कारवाया केल्याचा कांगावा करतात़ मूळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे़ ४शहराच्या गंजगोलाई, दयानंद गेटवरील रयतू बाजार, राजीव गांधी चौक, अंबाजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका आदी ठिकाणी सोमवारी पाहणी केली असता बहुतांश व्यावसायिकांकडे कॅरीबॅग दिसून आल्या़