शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:37 IST

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देसरोवरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचा परिणाम मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक सलीम अली सरोवराला अगोदरच अतिक्रमणांनी चारही बाजूने वेढले आहे. मागील अनेक वर्षांपासून सरोवराचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा  प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराची दिवसेंदिवस वाताहत होत चालली आहे. सरोवराच्या बाजूलाच महापालिकेने एसटीपी प्लांट सुरू केला आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून पाणी सरोवरात सोडण्यात येते. या परिसरात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी आपल्या घरातील ड्रेनेजचे पाणी सरोवरात सोडले आहे. मागील काही वर्षांपासून सरोवरातील दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाही महापालिका ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे. अलीकडेच खंडपीठाने सरोवराची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथकसुद्धा नेमले होते. त्यानंतर महापालिकेने सरोवरासाठी कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. दोन दिवसांपासून सरोवरातील लहान-मोठे मासे अचानक हजारोंच्या संख्येने मरत आहेत. मरण पावलेले मासे पाण्यावर तरंगत असल्याने आसपासच्या नागरिकांना ते दिसत आहेत. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे सरोवराची अवस्था पाहण्यासाठी अधिकारी फिरकलेसुद्धा नाहीत. मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

दूषित पाणी कारणीभूतसरोवरात दूषित पाणी येत असल्यामुळे माशांना आॅक्सिजन घेण्यासाठी त्रास होत असेल, म्हणून ते मरण पावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वी अनेकदा असा प्रकार घडला आहे. पूर्वी महापालिका मासेमारी करण्यासाठी व्यावसायिक मंडळींना ठेका देत असे. काही वर्षांपासून ही परंपरा बंद करण्यात आली आहे. 

मासे मरण्याची तीन प्रमुख कारणे01. सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मासे मरू शकतात.02. मागील चार महिन्यांपासून नागरिक निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यांच्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे मासे मरण पावत असतील.03. सरोवरातील माशाचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असेल तर त्याची बाधा इतरांनाही होऊ शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ