अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 16:53 IST2020-10-11T16:52:26+5:302020-10-11T16:53:12+5:30
गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व दोन मोबाईल घेऊन दुचाकीने जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिकलठाणा पोलिसांनी पकडले आणि त्याच्या ताब्यातून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा हस्तगत
औरंगाबाद : गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व दोन मोबाईल घेऊन दुचाकीने जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिकलठाणा पोलिसांनी पकडले आणि त्याच्या ताब्यातून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अल्पवयीन मुलगा दुचाकीने एमएच २०, ईव्ही ९९८० जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी शनिवारी सापळा लावला. गंगापूर जहागीर शिवारात सारा स्वप्नांगण सोसायटीजवळील रोडवर त्याला अडवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. दोन मोबाईल व मोटारसायकली असा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.