शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:05 IST

ज्या भावाने जमीन खरेदी केली, त्याच भावाने परत करा; शेतकऱ्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : निम्न दूधना प्रकल्पासाठी संपादित मात्र ज्या जमिनीवर पाणी साचत नाही, अशा जमिनीवर नियोजित सौर प्रकल्प रद्द करण्यात यावा. ज्या भावाने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केली त्याच दराने जमीन परत करा, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त २१ गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळपासून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) मुख्य अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी कडा परिसर दणाणून सोडला.

प्रकल्पासाठी संपादित जमिनीवर सौर प्रकल्प...परभणी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पासाठी सेलू तालुक्यातील विविध गावांतील हजारो शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतरही या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात नाहीत. शेतकरी दरवर्षी पाटबंधारे विभागाला गाळभाडेपट्टा भरून जमिनी कसत असतात. आता पाटबंधारे विभागाने ही जमीन सौर ऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी महावितरण कंपनीला देण्याचा करार केला आहे. ही बाब शेतकऱ्यांना समजताच शेतकरी संतप्त झाले. सुपीक जमीन आम्ही धरणासाठी दिलेली आहे. आमच्या जमिनीवर नियोजित सौर प्रकल्प रद्द करावा. आमच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात, त्यासाठी शासनाने आमच्याकडून जमिनीचा मोबदला भरून घ्यावा, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश राजबिंडे आणि सतीश जायकोजी निर्वळ यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले.आंदोलनात शेकडो शेतकरी, महिला आणि तरुण सहभागी झाले आहेत. आमची जमीन परत करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, सौर प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टी जिंदाबाद, शेतकरी संघटना जिंदाबाद, आदी घोषणा देत शेतकऱ्यांनी कडा परिसर दणाणून सोडला. आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तेथेच स्वयंपाकही सुरू केला.

अभियंता, अधीक्षक अभियंता कुठे गेले ?कडा कार्यालयात शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याचे निवेदन आधीच देण्यात आले होते. या शेतकऱ्यांना सामोरे जाण्याऐवजी मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार हे वेगवेगळ्या कारणांमुळे कार्यालयाबाहेर होते. सहायक मुख्य अभियंता राजू देशमुख यांनी आंदोलकांशी चर्चा केली. २७ जानेवारी रोजी याविषयी बैठक आयोजित करण्यात आली आहे, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा, असे पत्र दिले आणि ते कार्यालयातून निघून गेले. शेतकऱ्यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

या गावांतील शेतकरी आंदोलनातपरभणी जिल्ह्यातील रेवणगाव, सालगाव, कोंडेगाव, राणी वाहेगाव, सातोना खुर्द आणि सातोना बुद्रुक, देवळा, चिंचोली, मापेगाव, केदार वाकडी, नाणसी, मंगरूळ, गोपेगाव, वाजोळा, चांदेशोर, पाडळी, नागापूर, कोरेगाव, रोहिना खुर्द आणि बुद्रुक, तसेच करंजखेडा आदी गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Cancel Solar Project or Return Land: Farmers Protest at Office

Web Summary : Farmers demand cancellation of a solar project on fertile land acquired for the Dudhna project, threatening continued protests until their land is returned at the original purchase price. Officials have scheduled a meeting to discuss the issue.
टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरण