शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंचन’ची कामे रद्द की मंजूर?

By admin | Updated: August 8, 2014 01:25 IST

औरंगाबाद : सिंचन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या २७ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे रद्द करण्यात आली की नाहीत, याचे उत्तर द्या, अशी मागणी करीत

औरंगाबाद : सिंचन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या २७ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे रद्द करण्यात आली की नाहीत, याचे उत्तर द्या, अशी मागणी करीत लाभार्थी सदस्यांनी गुरुवारी (दि. ७) जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पाच तास ठिय्या मांडला. त्यामुळे समितीचे काहीच कामकाज होऊ शकले नाही. काही सदस्यांच्या मागणीवरून सिंचन विभागाचे प्रभारी विभागप्रमुख गजानन रबडे यांनी २७ कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केल्याचे पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी आयोजित जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पडसाद उमटणार हे स्पष्टच होते.जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. संतोष जाधव, सुदाम मोकासे, सूरज नाना पवार हे सदस्य सभागृहात घुसले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे बैठकीच्या कामकाजास सुरुवात होऊ शकली नाही. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अध्यक्षा, समिती सदस्य, अधिकारी व आंदोलनकर्ते तसेच बसून होते. आम्ही सभागृहात ५ तास बसून होतो. कामे रद्द करण्यात आल्याचे पत्र द्या, कामे रद्द करण्यात आली असतील तर ही २७ कामेच का? आतापर्यंत मंजूर सर्वच कामे रद्द करा, अशी आमची मागणी आहे. कामे रद्द केल्याचे पत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले नाही. मंजूर २७ गटांत यापूर्वी सिंचनाचे एकही काम झालेले नाही. -संतोष जाधव, जि. प. सदस्य.२७ कामांना प्रशासकीय मान्यता देणारे कार्यकारी अभियंता गजानन रबडे आज कार्यालयात नव्हते. त्यामुळे सदरची संचिका आम्हाला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे कामे रद्द झाली की, नाही हे सांगता येत नाही. बैठक उद्याही होणार आहे. त्यात सदर संचिका बोलावली जाईल. -एस. बी. लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीसिंचनाच्या काम वाटपावरून पाचही पक्षाचे सदस्य नाराज आहेत. तशा काही प्रशासकीय मान्यता निघाल्या असतील तर ते चूकच आहे. काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने मी जिल्हा परिषदेत मागे येऊ शकलो नाही. उद्या आम्ही एकत्रित बसून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करू. -विनोद तांबे, गट नेता, काँग्रेस