शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला

लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ अ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणाणून पराभव झाला असून, बसपापुरस्कृत व भाजपाच्या पाठिंब्याने डॉ़ विजय अजनीकर १५६ मतांनी विजयी झाले आहेत़ डॉ़ अजनीकर यांना एकूण १४४२ मते पडली आहेत़ तर काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल कांबळे हे १२८६ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत़ अन्य दोन अपक्ष उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ तर औसा पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, चाँदबी पटेल या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाला आहे.गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ अ मधून अ‍ॅड़व्यंकट बेद्रे हे विजयी झाले होते़; परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविले़ त्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ यात भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेस बरोबर अपक्षांची लढत झाली़ त्यात बसपापुरस्कृत व भाजपा पाठिंब्यावर डॉ़विजय अजनीकर यांनी बाजी मारली असून त्यांना ३१२३ मतांपैकी १४४२ मते पडली आहेत़ त्या खालोखाल काँग्रेस उमेदवार कांबळे यांना १२८६ मते मिळाली असून अपक्ष व शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या विठ्ठल भोसले यांना २९५ तर शिवप्रसाद श्रृंगारे या अपक्ष उमेदवारास ७६ मते पडली आहेत़ तर २४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले आहे़ भोसले व शृंगारे यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे़ गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ़विजय अजनीकर यांनी बसपाच्या तिकिटावर या प्रभागातून निवडणूक लढवली होती़ त्यांना ९५० मते मिळाली होती़ या निवडणूकीत त्यांनी बसपापुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भाजपानेही पाठिंबा दिला़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊन ते विजयी झाले़काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्यमंत्री अमित देशमुख यांनी शेवटच्या क्षणी या प्रभागात ६ ते ८ कॉर्नर बैठका घेऊन एक जाहीर सभा घेतली होती़ परंतु, मतदारांनी कौल अपक्ष उमेदवार डॉ़विजय अजनीकर यांच्या बाजूने दिला असून, महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ ५० वर जाण्याऐवजी ४९ वरच राहिले आहे़ (प्रतिनिधी)औसा पालिकेत राष्ट्रवादीचा गड कायमऔसा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाँदबी आखलाख पटेल या १६५१ मते घेवून विजयी झाल्या आहेत़ त्यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार रजीयाबी नजीरसाब शेख यांचा पराभव केला असून, त्यांनी राष्ट्रवादीचा हा गड कायम ठेवला आहे़ राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक लागली होती़ या निवडणुकीत रजीयाबी शेख यांना ६८४, तहसीन असलम पठाण २९९, मेहराजबी शेख १२६ तर मंगलबाई बेवनाळे यांना १४ मते पडली़ ५४ मतदारांनी नकारार्थी मतदान केले असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी दत्ता भारस्कर यांनी दिली़सत्ताधारी काँग्रेसचे अर्धशतक हुकले..! लातूर मनपा प्रभाग क्र. १३ अ ची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली असती, तर मनपा सभागृहात काँग्रेसची सदस्य संख्या ५० वर गेली असती. परंतु, पराभव झाल्याने त्यांचे सभागृहातील अर्धशतक हुकले आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांकडून सुरुवातीला प्रचार कमी झाला. राज्यमंत्री अमित देशमुख यांनी बैठका आणि सभा घेतल्यानंतरच पक्ष कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले होते. तोपर्यंत बसपा पुरस्कृत उमेदवार डॉ. विजय अजनीकर यांनी प्रभाग पिंजून काढून मतदारांपर्यंत पोहोचले होते.