शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पटीच्या आमिषाने दाम्पत्याला एक कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:13 IST

दामदुप्पट परताव्याचे आमिष : बंटी बबली जोडपे पसार

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत एका बंटी बबलीने परिसरातीलच दाम्पत्याला एक कोटी रुपयाचा गंडा घालून पसार झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात श्रृती मयूर बाफना व मयूर राजकुमार बाफना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील प्रभाकर वासे (५७, रा. वर्धमान रेसिडेन्सी, उल्कानगरी) हे बजाज कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या बाफना दाम्पत्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाफना मार्क्स कॅपिटल ॲडव्हायजर प्रा. लि. नावाने व्यवसाय करत होते. त्याद्वारे अनेकांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत होते. वासे यांनाही त्यांनी २०२१ मध्ये त्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीसाठी गळ घातली. वासे यांनी विश्वास ठेवत जून २०२१ पासून ५ टप्प्यांत बाफनाकडे ६५ लाखांची गुंतवणूक केली.

सहा लाखांचा परतावा दिला पण...बाफनाने वासे यांना जुलै २०२१ ते मे २०२३ दरम्यान १२ टप्प्यांमध्ये सहा लाख ७० हजारांचा परतावा दिला. मात्र, त्यानंतर परतावा दिलाच नाही. त्यांनी आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करू, असे आश्वासन दिले. मात्र, डिसेंबरमध्ये बाफना दाम्पत्य अचानक घराला कुलूप लावून पसार झाले. वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, घराला तेव्हापासून कुलूप आहे. वासे यांची मूळ ६५ लाख व परताव्याची ४६ लाख ७० हजार असे १ कोटी ५ हजार रुपयांची फसवणूक केली.

फसवणुकीची रक्कम वाढणारबाफनाच्या विरोधात पहिली तक्रार वासे यांनी केली. यात आणखी गुंतवणूकदार अडकण्याची शक्यता असून फसवणुकीची रक्कम वाढू शकते. संबंधितांनी बँकेच्या व्यवहाराच्या माहितीसह जवाहरनगर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक दिलीप चंदन यांनी केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद