घरगुती वादातून व्यवसायिकाची पत्नीनेच केली चाकूने भोसकून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:39 IST2019-09-17T10:18:38+5:302019-09-17T11:39:47+5:30
व्यावसायिकाचे पत्नीसोबत सातत्याने वाद होत असत

घरगुती वादातून व्यवसायिकाची पत्नीनेच केली चाकूने भोसकून हत्या
औरंगाबाद: घरगुती वादातून उद्योजका चा पत्नीने चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास उल्कानगरी भागातील खिवंसरा पार्क मध्ये घडली.या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपी पत्नी ला अटक केली .
शैलेंद्र शिवसिंग राजपूत (४०)असे मयताचे नाव आहे .
मयत शैलेंद्र आणि त्यांच्या भावांचा वाळुज एमआय डी सी मध्ये हिरा पॉलीमर नावाचा उद्योग आहे. राजपूत यांचे लव्ह मॅरेज झाले होते .त्यांना १६वर्ष आणि ६ वर्षीय अशा दोन मुली आहेत . राजपूत दांपत्यात घरगुती कारणावरून सतत भांडण होत होते. त्यांच्या पत्नीने शैलेंद्रच्या आईविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती . सयुंक्त कुटुंबात राहणे त्यांच्या पत्नीला आवडत नव्हते .यामुळे त्यांच्यात वाद होत पत्नीच्या आग्रहाखातर शैलेंद्र हे पैठणरोडवरील बंगला सोडुन चार महिन्यापूर्वी खिवंसरा पार्क येथील मित्राच्या घरात किरायाने राहण्यासाठी आले होते.
दरम्यान रात्री दांपत्यामध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले यात पत्नीने रागाच्या भरात शैलेंद्रच्या जांगेत किचनमधील चाकू खूपसला .यामुळे प्रमुख नस कापल्याने अतीरक्तस्राव झाला आणि शैलेंद्र ठार झाले .