बस चालकाला मारहाण झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात चक्काजाम
By संतोष हिरेमठ | Updated: November 12, 2024 15:11 IST2024-11-12T15:10:42+5:302024-11-12T15:11:24+5:30
चालकाला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करत केला चक्काजाम

बस चालकाला मारहाण झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात चक्काजाम
छत्रपती संभाजीनगर: एका चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर मध्यवर्ती बसस्थानकात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. त्यामुळे शेकडो बसेस जागेवर उभे राहून प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या मार्गापासून तर बसेस बाहेर पडणाऱ्या मार्गापर्यंत बसेसच्या रांगा लागल्या आहेत. चालक वाहक प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत आहे. चालकाला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित बसचे चालक आणि वाहक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले आहेत. त्यानंतर बस निघायला सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.