शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावात माथेफिरूनी कार जाळली

By admin | Updated: December 18, 2015 23:49 IST

वाळूज महानगर : वाहने जाळणाऱ्या माथेफिरूने शुक्रवारी पहाटे रांजणगाव शेणपुंजी येथील रावसाहेब बोऱ्हाडे यांची कार जाळून पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे.

वाळूज महानगर : वाहने जाळणाऱ्या माथेफिरूने शुक्रवारी पहाटे रांजणगाव शेणपुंजी येथील रावसाहेब बोऱ्हाडे यांची कार जाळून पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे. वाहने जाळणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाळूज महानगरात काही महिन्यांपूर्वी वाहने जाळणाऱ्या माथेफिरू टोळीने हैदोस घातला होता. बजाजनगर, सिडको, रांजणगावातील अनेक वाहनांची या टोळीने होळी केली. या प्रकरणातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर मध्यंतरी वाहने जाळण्याचे प्रमाण आटोक्यात आले होते. या माथेफिरू टोळीने शुक्रवारी पहाटे ४ वाजेदरम्यान रावसाहेब बोऱ्हाडे (रा. नेहरूनगर, रांजणगाव शेणपुंजी) यांची घरासमोर उभी केलेली कार व त्यांच्या घरासमोरील प्रल्हाद लोहार यांचे पत्र्याचे शेड जाळले. यात कारचा समोरील व आतील भाग जळून खाक झाला तर पत्र्याचे शेडही जळाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुुरू होती. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी वाहने जाळणाऱ्या एका माथेफिरूला काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. अटक केलेल्या माथेफिरूने एक वर्षापासून वाहने जाळत असून, कोणत्या भागात किती वाहने जाळली, याची कबुली दिली आहे. परंतु बजाजनगर व इतर भागांत वाहने जाळण्याचे सत्र मागील ५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अन्य वाहने कोणी जाळली, मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध लावणे वाळूज एमआयडीसी पोलिसांसमोर एक आव्हानच आहे.