शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे बजेट जाणार ८१० कोटींवर

By admin | Updated: May 19, 2014 01:33 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या बजेटवर २० मे रोजी चर्चा होणार असून, महापौर कला ओझा या बजेटमध्ये सुमारे १५० कोटींची वाढ करणार आहेत.

औरंगाबाद : महापालिकेच्या बजेटवर २० मे रोजी चर्चा होणार असून, महापौर कला ओझा या बजेटमध्ये सुमारे १५० कोटींची वाढ करणार आहेत. त्यामुळे मनपाचे बजेट ८१० कोटींवर जाणार आहे, अशी माहिती सत्ताधार्‍यांच्या गोटातून समजली आहे. २० मे रोजी बजेटवर सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. एलबीटी भरण्यास व्यापार्‍यांनी केलेला विरोध पाहता पालिकेची आर्थिक कोंडी होत आहे. मागच्या वर्षीची अनेक कामे झालेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये स्थायी समितीने वाढविलेले ११३ कोटी आणि महापौरांकडून आलेल्या संभाव्य १५० कोटी, अशा २६३ कोटींच्या कामांसाठी प्रशासन उत्पन्न कुठून वाढविणार, असा प्रश्न आहे. भाजपा आणि सेनेमध्ये बजेटवरून वाद आहेत. प्रशासनाने दिलेल्या ५४९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ११३ कोटी रुपयांची वाढ केली. महापालिका प्रशासनाने वर्ष २०१४-१५ साठी ५४९ कोटी ११ लाख रुपयांचे बजेट सादर केले. ३१ मार्च २०१५ पर्यंत सर्व महत्त्वाचे खर्च करून पालिकेच्या तिजोरीत १९ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज बजेटमध्ये होता. वास्तववादी आणि कुठल्याही विकासकामांना थारा नसलेले हे बजेट २२५ कोटी रुपयांच्या शिल्लक कामांवर गदा आणणारे आहे, तर नवीन कामे जरी त्यात बळजबरीने घुसडली तरीही ती कामे पूर्ण होण्याची काहीही शाश्वती देता येणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले. हे मनपाचे शेवटचे बजेट आहे. पुढच्या वर्षी मनपाच्या निवडणुका असल्यामुळे फेबु्रवारी २०१५ मध्ये फक्त लेखानुदान समोर येईल.