शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्ती योजना लादू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 8:12 PM

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलला फटका बसत आहे. 

औरंगाबाद : बीएसएनएलने कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवून ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू केली आहे. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती करू नये. ज्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायची आहे त्यांना कोणत्याही अडचणी न आणता मुक्त वातावरणात निर्णय घेऊ द्यावा, तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतली नाही त्यांच्या आर्थिक संरक्षणाची हमी घ्यावी, असा सूर नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्प्लाईज बीएसएनएल कार्यकारिणीच्या बैठकीत उमटला. 

आर्थिक डबघाईला आल्याचे कारण सांगत बीएसएनएलने कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना लागू केली आहे. ५० वर्षांवरील सर्व कर्मचारी या योजनेस पात्र आहेत. मात्र, या योजनेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात मंगळवारी महसूल प्रबोधिनी येथे नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्प्लाईज बीएसएनएल या कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक झाली. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून पदाधिकारी आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएलचे महाव्यवस्थापक वाय.के. बनसोड, अ‍ॅड. विष्णू ढोबळे, तर  अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदू पाटील  होते.

या बैठकीत ३२ जिल्हा सचिव व २२ पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. सर्वांनी आरोप केला की, कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवून बीएसएनएलने व्हीआरएस योजना लागू केली आहे. ऐच्छिक सेवानिवृत्ती असे जरी योजनेचे नाव असले तरी त्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी पतसंस्था, बँक, एलआयसीचे कर्ज काढले आहे. त्याचे पैसे आता कोण भरणार?  पेन्शन लागू होणार की नाही. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० वर्षांच्या आत आहे अशा कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, असा प्रश्नही उपस्थित केला. या प्रश्नाचा पाठपुरावा संघटनेने करावा, अशी मागणी सर्वांनी केली. कर्मचाऱ्यांचे सध्या एक महिना उशिरा पगार होत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील ६ महिन्यांपासून पगार झाले नाहीत. वीज बिल थकल्याने बीएसएनएलचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. अशा पद्धतीने त्रास देऊन कर्मचाऱ्यांना व्हीआरएससाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. संघटनेने कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. राज्य सचिव रंजन दाणी यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. पी.पी. पाटील यांनी आभार मानले. 

बीएसएनएल होऊ शकली असती नंबर वन संघटनेचे राज्य सचिव रंजन दाणी यांनी सांगितले की, व्हीआरएससाठी सरकार २९ हजार कोटी खर्च करीत आहे. सरकाराने ही रक्कम  डीओटीच्या कर्मचारी पगारावर खर्च करावी. ४ जी स्पेक्ट्रम दिले असते व खाजगी कंपन्यांना दिलेल्या कर्जापेक्षा अर्धे कर्ज दिले असते तरी बीएसएनएल नंबर एक झाली असती. व्हीआरएसमधून एकाच वेळी ८० हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलला फटका बसत आहे. 

अशा आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या - कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने ‘व्हीआरएस’ घेऊ नये.- सर्व बाजूंचा विचार करून कर्मचाऱ्यांनी ‘व्हीआरएस’वर निर्णय घ्यावा.- ज्या कर्मचाऱ्यांनी पतसंस्था, बँक, एलआयसीकडून कर्ज काढले आहे, त्यांचे हप्ते बीएसएनएलने जमा करावेत.- पगार वेळच्या वेळी द्यावा.- व्हीआरएस घेणाऱ्या लोकांना वेगळे न समजता त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करावे. - व्हीआरएसनंतर पेन्शन देण्यात यावे. - ज्यांनी व्हीआरएस घेतली नाही, त्यांना आर्थिक संरक्षणाची हमी द्यावी.

टॅग्स :BSNLबीएसएनएलEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद