शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

देशातील महिला अत्याचारांची क्रूरता चिंताजनक : वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:21 IST

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

ठळक मुद्देसंस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात.

औरंगाबाद : देशभर महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकडेच सतत लक्ष वेधले जाते. मात्र, त्या अत्याचारातील क्रूरता भयंकर आहे. महिलांनी सांस्कृतिक लक्ष्मणरेषा ओलांडल्याच्या आविर्भावातून होणारे अत्याचार गंभीर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ही सांस्कृतिकतेची मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, असे विचार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी मांडले.

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत वृंदा करात यांनी ‘भारतीय महिला सबलीकरण’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सुखदेव शेळके होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संस्थेचे सचिव आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्या डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते. 

वृंदा करात म्हणाल्या, महिलांना बिगरपगारी कामे करावी लागतात, ही कामे घरातील असतील किंवा बाहेरची. त्याचा पगार मिळत नाही. त्याचवेळी महिलांना घरातील संपत्तीमध्येही वाटा दिला जात नाही. महिला घराबाहेर पडली, तर तिच्याविषयी समाजात चर्चा केली जाते. स्त्री-पुरुष समानता ही महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल तेव्हा येईल. त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. समाज तंत्रज्ञानानुसार सर्व पातळ्यावर आधुनिक होत असताना जातिप्रथा, धर्म आणि महिलांविषयीचे विचार बलण्यास तयार नाही. हा विचार बदल करण्यासह त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. महिला अत्याचारावर फाशी हा उपाय नाही. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात. त्यातूनच हे अत्याचार होत आहेत. त्यामुळे धर्म-जातीच्या नावासह संस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. त्याशिवाय महिला सक्षम होणार नाहीत. आता मुळावरच घाव घालण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी केले. परिचय डॉ. भालचंद्र कांगो यांनी करून दिला. सूत्रसंचालन करून डॉ. सी.एस. पाटील यांनी आभार मानले.

नारीवाद गाली हो गई हैसामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ढाचा सोडून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. रूढी-परंपरांनी त्यात अडथळे निर्माण केले आहेत. याविरोधात बोलणाऱ्या महिलांना टार्गेट केले आहे. ‘नारीवादी (स्त्रीवादी) गाली हो गाई है’ अशी खंतही वृंदा करात यांनी व्यक्त केली. भारतीय इतिहासात कोठेही महिला सक्षमीकरण चळवळीने पुरुषांना टार्गेट केलेले नाही. पुरुषांच्या विरोधात ही चळवळ कधीही नव्हती आणि नसेल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचे नेतृत्व जनता स्वीकारते; पण...महिलांचे नेतृत्व जनतेने कधीही नाकारलेले नाही. इंदिरा गांधी, मायावती, सोनिया गांधी आदींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. मात्र, राजकीय पक्षांनाच महिला चालत नाहीत. लोकसभेच्या ५४४ जागांपैकी केवळ २३ जागांवर महिला खासदार आहेत. त्यामुळे महिलांना लोकसभा निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संसदेत महिलांच्या प्रश्नांसंबंधी काही चर्चा असेल, तर पुरुष खासदार वेगळ्या पद्धतीची गॉसिपिंग करतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

मानधन नाकारलेदेवगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे व्याख्यान झाल्यानंतर वृंदा करात यांना मानधनाचे पाकीट देण्यात आले. तेव्हा मार्गदर्शन केल्यानंतर पाकीट घेण्याची आमच्या पक्षाची प्रथा, परंपरा नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी मानधन नाकारले.

टॅग्स :WomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषणIndiaभारतAurangabadऔरंगाबादDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबाद