शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपटाला उज्ज्वल भवितव्य

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

सितम सोनवणे, लातूर ‘इश्क वाला लव्ह’ हा चित्रपट नव्या बांधणीचा असून अशा प्रकारच्या नवनवीन चित्रपटाने मराठी चित्रसृष्टी समृद्ध बनत आहे़ त्यामुळे मराठी चित्रपटाला

सितम सोनवणे, लातूर‘इश्क वाला लव्ह’ हा चित्रपट नव्या बांधणीचा असून अशा प्रकारच्या नवनवीन चित्रपटाने मराठी चित्रसृष्टी समृद्ध बनत आहे़ त्यामुळे मराठी चित्रपटाला आगामी काळात उज्ज्वल भवितव्य आहे, असे मत चित्रपट अभिनेते अदिनाथ कोठारे यांनी बुधवारी व्यक्त केले़‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते लातूरला आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मुक्त संवाद साधला़ अदिनाथ कोठारे म्हणाले , मराठी चित्रपटाच्या प्रवासात वेड लावे जीवा, सतरंगी रे, हिंदीतील स्पॉट बॉय, दुभंग तसेच मराठी संगीत नाटक आॅल द बेस्ट, झपाटलेला-२ या चित्रपटात अभिनय करीत या क्षेत्रात मी समृद्ध बनण्याचा प्रयत्न करत आहे़ अवताराची गोष्ट या चित्रपटाला तर झी गौरव फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे़ व मलाही उत्कृष्ट कलावंत म्हणून माझाही गौरव करण्यात आला आहे़सिनेमा हे महत्वाचे माध्यम आहे़ प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे प्रभावी साधन आहे़ चित्रपटामुळे बरेच लोक प्रेरित होतात़ त्यांच्या जीवनात कायापालट होतो़ तर काही चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून असतात़ प्रेक्षकांना निखळ मनोरंजीत करण्यासाठी बनविले जातात़ या दोन्ही प्रकारच्या चित्रपटात मी काम केले आहे. पे्रक्षकांनीही मला भरभरुन प्रेम दिले आहे़ यापुढे जावूनही मला निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात मोठ व्हायचं आहे़ येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करुन जीवनात यशस्वी व्हायच आहे़वडील महेश कोठारे यांनी सांगितल्याप्रमाणे मी सतत मेहनत करत राहतो़ जे करतो ते उत्तम करतो़ आणि त्यामुळेच आज मराठी चित्रपटात माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करु शकलो़ यापुढेही चांगल्या पद्धतीचे चित्रपट करुन मराठी चित्रपटात चांगले काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले़