शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

जुनी कामे पूर्ण केल्यासच बीआरजीएफचा निधी

By admin | Updated: November 28, 2014 01:08 IST

हिंगोली : जिल्ह्यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेची मागील तीन वर्षांतील कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच निधीचे वितरण करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेची मागील तीन वर्षांतील कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच निधीचे वितरण करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.या योजनेत ११.३९ एवढा निधी जिल्ह्याला मंजूर आहे. यात ग्रामपंचायतींची ९.0१ कोटींची ८२२ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी ेदेण्याचे काम सध्या सुरू आहे. हिंगोली पंचायत समितीत १.१३ कोटींच्या ४८ ग्रामपंचायतींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी दिली. तर जिल्ह्यातील इतर पंचायत समितींच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यात औंढ्यात २२ ग्रा. पं. च्या ६५ लाखांच्या, वसमतच्या ५१ ग्रा. पं. च्या १.४४ कोटींच्या, कळमनुरीच्या ७६ ग्रा. पं. च्या १.८३ कोटींच्या तर सेनगाव तालुक्यातील ३६ ग्रा. पं. च्या ७७ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.२00९ ते १३ या कालावधीत ग्रामपंचायतींनी विविध कामे घेतली. मात्र अनेकांनी ही कामे पूर्ण केली नाहीत. दरवर्षी नवा निधी मिळत गेला म्हणजे जुन्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जुनी कामे केल्याशिवाय नवा निधीच वितरित केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. रस्ता, नाली, संरक्षक भिंत, तारकुंपन, जनावरांसाठी पानवठे, अंगणवाडी दुरुस्ती असे कामे घेतली जातात. जी कामे निधीअभावी रखडली वा निधीच मिळणार नाही, अशी कामे यात अपेक्षित आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)