शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अविश्‍वास ठरावाला ब्रेक...

By admin | Updated: November 19, 2014 13:09 IST

जिल्हा परिषदेचे सीईओ अभिमन्यु काळे यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव आणण्याच्या प्रयत्नाला दुसर्‍याच दिवशी ब्रेक बसला.

नांदेड : जिल्हा परिषदेचे सीईओ अभिमन्यु काळे यांच्याविरूद्ध अविश्‍वास ठराव आणण्याच्या प्रयत्नाला दुसर्‍याच दिवशी ब्रेक बसला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना समज देत योग्य मार्गाने काम करण्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिल्यानंतर अविश्‍वासाच्या घडामोडी थंडावल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण पेल्यातील वादळ ठरले. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बोगस बदल्याप्रकरणात अनेक पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांची नावे पुढे आली. या कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र त्याला यश आले नाही. परिणामी सीईओंविरूद्ध थेट अविश्‍वास ठरावच आणण्याच्या घडामोडी पडद्याआड सुरू होत्या. या प्रक्रियेला मूर्त स्वरूप येण्यापूर्वीच बुधवारी लोकमतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांना शिवाजीनगरात पाचारण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांना योग्य समज दिली. तसेच या प्रक्रियेत कोणताही सहभाग राहणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना दिली. या सूचनेनंतर या विषयावर बोलणेही जि. प. च्या पदाधिकार्‍यांनी टाळले. विद्यमान अध्यक्षा मंगला गुंडले यांनी अशा प्रकारचा कोणताही अविश्‍वास जिल्हा परिषदेत येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जे कुणी अशा बाबी करू इच्छित असतील त्यांनीही असे करू नये, असा सल्ला दिला. असे प्रकार घडल्यास जिल्ह्यात चांगले अधिकारी येण्यास धजावणार नाहीत असेही गुंडले म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी बुधवारी एकत्र येत लोकमतमधील वृत्ताचे मंथन केले. यापुढे जिल्हा परिषदेत काम करताना एकतेचे दर्शन घडविण्याचा संकल्पही या पदाधिकार्‍यांनी केला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणार्‍या सदस्यांनी जिल्ह्यात शौचालय बांधकामासह अन्य रखडलेल्या कामांनाही गती देण्याची मागणी केली आहे. /(प्रतिनिधी)