गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात

By Admin | Updated: December 3, 2015 00:37 IST2015-12-02T23:53:51+5:302015-12-03T00:37:59+5:30

गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील आहेर वाहेगाव जवळ एका खासगी वाहनाचा गेवराई पोलिसांनी पाठलाग करुन गाडीतील दोघांकडूनयसह एका गावठी पिस्तुल ताब्यात घेतले.

Both of them along with the village pistol | गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात

गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात


गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील आहेर वाहेगाव जवळ एका खासगी वाहनाचा गेवराई पोलिसांनी पाठलाग करुन गाडीतील दोघांकडूनयसह एका गावठी पिस्तुल ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री केली.
पाचेगाव शिवारातून चारचाकी वाहनामध्ये गावठी पिस्तुल घेऊन जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान मंगळवारी मध्यरात्री पाचेगाव शिवार रस्त्यावरून जाणाऱ्या चार चाकी वाहन (क्र मांक एमएच १२ वाय ए- ७६४४)चा पाठलाग करून गाडी थांबवून तपासणी केली असता गाडी मध्ये सुरज आसराजी छाजेड (रा. बालमटाकळी) व इंदरिसंग रामलालिसंग राजपूत (रा. हैदराबाद) हे दोघे आढळून आले. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एक गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी गाडी व पिस्तूलसह दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गेवराईचे निरीक्षक सुरेंद्र गंदमसह उपनिरीक्षक आर. सागडे, ए. व्हि. पवार, सहायक उपनिरीक्षक एस. आर. आईटवार, हेड कॉन्स्टेबल एस. के. सांगळे व चालक युनुस शेख यांनी केली. गेवराई ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)

Web Title: Both of them along with the village pistol