शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:24 IST

वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल देवडे आणि डॉ. देशराज मीना या दोघांनी राजीनामे जिल्हाशल्य चिकित्सक आणि तहसीलदार सोयगाव यांचेकडे सादर केले आहे.

सोयगाव ( औरंगाबाद ) : सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिक्त असलेली पदे आणि कामांचा वाढलेला व्याप व रुग्णसंख्येत झालेली वाढ या कारणांमुळे रविवारी तडकाफडकी राजीनामे जिल्हा शल्य चिकित्सक औरंगाबाद यांना सादर केल्याने आता सोयगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना झाले आहे. ऐन कोरोना संसार्गाच्या तिसऱ्या लाटेत आणि कोविड लसीकरणाच्या गतिमान प्रक्रियेत अडचणी निर्माण झाली आहे.

जिल्ह्यासह राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना या संकटाच्या तोंडावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल देवडे आणि डॉ. देशराज मीना या दोघांनी राजीनामे जिल्हाशल्य चिकित्सक आणि तहसीलदार सोयगाव यांचेकडे सादर केले आहे. या पूर्वीच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांचा करार आठवड्यापूर्वी संपलेला आहे.त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक विभागाने अद्यापही पूर्ववत करून घेतलेले नसल्याने सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार अनियंत्रित झालेला आहे. तापेच्या रुग्णांची वाढती संख्या आणि रिक्त असलेली पदे यामुळे कामांचा व्याप वाढलेला असल्याने राजीनामे सादर केले असल्याचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. जिल्हा प्रशासनाचे सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. ऐन तिसऱ्या लाटेचं तोंडावर सोयगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना झालेले असून नुकतेच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला कोविड केंद्राचा दर्जा प्राप्त झालेला असल्याने आगामी काळातील रुग्णांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडे झालेला आहे परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारीच राहणार नसल्याने सोयगावकरांना तिसऱ्या लाटेची चिंता पडलेली आहे.

शहरात कोविड लसीकरण बंदवैद्यकीय अधिकारीच नसल्याने आठवड्यापासून शहरातील नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित आहे आठवडाभरापूर्वी सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला पाठविण्यात आलेला कोविड लसीकरणाचा साठा अद्यापही पडून असल्याने तब्बल दोनशे कोविड डोसेस धूळखात पडून आहे.सोयगाव परिसरात नुकतीच मलेरिया आणि तापेची साथ सुरु झालेली आहे त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.सोयगावचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला असूनही याकडे तालुका प्रशासनासह जिल्हा शल्य विभागाने कानाडोळा केला आहे.

कोविड चाचण्या ठप्पकोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात तातडीने कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आढावा बैतःकीत दिले आहे परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे यांचा करार संपल्याने सोयगावला कोविड चाचण्याही ठप्प झाल्या आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर