शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 06:24 IST

Indigo flights issue: शहरातून १२३ प्रवासी मुंबईला गेले. याच विमानात रद्द झालेल्या बुधवार सकाळच्या नियमित विमानातील प्रवाशांचीही सोय करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोचे मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले. तर मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ताटकळविल्यानंतर रद्द केलेल्या विमानातील प्रवाशांची बुधवारी सकाळी प्रवासाची सोय करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणारे प्रवासी तब्बल १२ तासांनंतर शहरात दाखल झाले.  इंडिगोचे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत आहे. मंगळवारी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळविल्यानंतर हे विमानच रद्द करण्यात आले. सर्वाधिक हाल मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या प्रवाशांचे झाले. रात्र मुंबई विमानतळावरच काढावी लागली. 

छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांची हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. तर काहींना रस्ते मार्गाने मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. याबाबत स्थानिक इंडिगोप्रमुख अनिरुद्ध पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

१३१ आले, १२३ प्रवासी गेले 

मंगळवारी रात्री रद्द झालेल्या विमान प्रवाशांसाठी बुधवारी सकाळी विमानसेवा देण्यात आली. या विमानाने मुंबईहून १३१ प्रवासी आले, तर शहरातून १२३ प्रवासी मुंबईला गेले. याच विमानात रद्द झालेल्या बुधवार सकाळच्या नियमित विमानातील प्रवाशांचीही सोय करण्यात आली.

दिल्लीचे विमान बुधवारी एक तास उशिरा आले. त्यामुळे शहरातून दिल्लीला जाणाऱ्या विमानासही विलंब झाला. 

लंडनहून मंगळवारी दुपारी मुंबई विमानतळावर आले. सायंकाळच्या विमानाने शहरात येणार होते. परंतु  मंगळवारची रात्र मुंबई विमानतळावर काढावी लागली. इंडिगोकडून काहीही माहिती दिली जात नव्हती. सकाळी विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यातही रद्द झालेल्या नियमित प्रवाशांची सोय करण्यात आली. या विमानानेही एक तास उशिराने मुंबईहून उड्डाण घेतले. -वेदश्री बोरगावकर, प्रवासी

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Flights Cancelled: Passengers Stranded in Sambhajinagar for 12 Hours

Web Summary : Indigo cancelled Mumbai flights, leaving Sambhajinagar passengers stranded. Passengers faced significant delays and overnight stays at Mumbai airport. Alternative arrangements were made, including hotel stays and road transport. Regular flight disruptions continue, impacting travelers significantly.
टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानAirportविमानतळ