गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 15:21 IST2023-05-28T15:20:01+5:302023-05-28T15:21:29+5:30

गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केलं आहे.

Both Gautami Patil and Sushma Andhare, Shinde group's MLA Sanjay Shirsat's criticism | गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

छ. संभाजीनगर - शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात कलगीतुरा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर बोचरी टीका केली होती. त्यासंदर्भात अंधारे यांनी पोलिसांत धाव घेतली होती. आता, पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंना लक्ष्य केलंय. सुषमा अंधारे ह्याही एक्टर आहेत, असे म्हणत गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही एक्टर आहेत, पण वेगवेगळ्या क्षेत्रातील असे म्हणत शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्यांस लक्ष्य केलं.  

गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केलं आहे. तसेच, माधुरी दीक्षितला कोणी आडनाव बदलण्याचं आजपर्यंत नाही म्हटलं, असेही अंधारे यांनी म्हटलं होतं. सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केल्यासंदर्भात आमदार शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी सुषमा अंधारेंवर बोचरी टीका केली. 

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत, त्यामुळे सपोर्ट केला असेल. या दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील अॅक्टर आहेत. एका एक्टरने दुसऱ्या अॅक्टरला सपोर्ट करणे यात काही गैर नाही. गौतमी पाटील इमानदारीने पोटासाठी कला सादर करते म्हणून तिला वाईट असे मी म्हणणार नाही, ती तिच्या पोटासाठी मेहनतीनं काम करत आहे. वसुली करुन जर कोणी पोट भरत असेल तर गौतमी आणि त्यांच्यातला हा फरक आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांना लक्ष्य केलं. तसेच, कुणाचा तळतळात घेऊन, वाभाडे काढून, नावं ठेवून सुषमा अंधारे यांनी त्यांची लोकप्रियता जपली आहे, असा टोलाही शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.  

गौतमी पाटीलचं कौतुक

गौतमी पाटील ही मेहनती आहे, ती करत असलेल्या कामातून ते दिसत आहे. आपली कला लोकांसमोर सादर करते व पोट भरते. लोक तिच्या कार्यक्रमाला येतात हेच खऱ्या अर्थाने तिचे यश आहे, मी तिचे अभिनंदन करतो, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी गौतमी पाटीलचे अभिनंदन आणि कौतुक केलंय.

Web Title: Both Gautami Patil and Sushma Andhare, Shinde group's MLA Sanjay Shirsat's criticism