शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बोलबच्चन आरोपी राजेंद्र जैन याने पोलिसांनाही फिरवले महिनाभर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 19:59 IST

आईसाठी १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी दुकानात गेला अन्...

ठळक मुद्देसीबीआयने पैसे जप्त केल्याचे पाठविले छायाचित्र पेठे यांनीही त्याच्यावर तब्बल सहा महिने विश्वास ठेवला.

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाच्या मदतीने ६५ किलो सोन्याचे दागिने पळविणाऱ्या राजेंद्र जैन याने आपल्याविरोधात गुन्हा दाखल करू नका, मी मोठ्या घरातील व्यक्ती आहे. पेठे यांचे सोन्याचे दागिने मी परत करतो. मला आठ-पंधरा दिवस मुदत द्या, अशी विनंती करणारे मेसेज पाठवून आणि वारंवार फोन करणाऱ्या बोलबच्चन राजेंद्र जैनने पोलिसांनाही तब्बल महिनाभर फिरवल्याचे समोर आले.

आईसाठी दहा गॅ्रमचे सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये राजेंद्र जैन हा समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये गेला. बोलबच्चन राजेंद्रने पहिल्याच भेटीत व्यवस्थापक अंकुर राणे याच्यासोबत ओळख करून घेतली. नंतर तो वर्षभर सतत दागिने खरेदीच्या निमित्ताने दुकानात जात होता. वर्षभरात त्याची आणि राणेची चांगलीच मैत्री झाली. कधी कधी तो उधारीवर सोन्याचे दागिने घेऊन जात असे आणि दोन ते चार दिवसांनंतर उधारीची रक्कम परत करी. उधारीवर सोने दिल्याच्या बदल्यात तो राणेला चारशे ते पाचशे रुपये  कमिशन द्यायचा. असा राणेचा त्याने विश्वास संपादन केला. त्याने राणेकडून आॅक्टोबर २०१८ मध्ये पाच किलो सोने नेले. नंतर थोडे, थोडे करून आणखी पाच किलो दागिने तो घेऊन गेला. मार्च २०१९ पर्यंत त्याने ६५ किलो दागिने नेले. हे दागिने त्याने विक्री केले तर काही गहाण ठेवले. हा प्रकार दुकानमालक विश्वनाथ पेठे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी राजेंद्रला बोलावून दागिने परत करण्याचे सांगितले. तेव्हा त्याने आठ दिवसांत देतो, पंधरा दिवसांत आणून देतो, असे सांगून तो वेळ मारून नेत होता.

सीबीआयने पैसे जप्त केल्याचे पाठविले छायाचित्रराजस्थानमधून जमीन विक्री करून येत असताना सीबीआयने आपली कार पकडली. या कारमध्ये कोट्यवधी रुपये होते, अशी थाप राजेंद्रने पेठे यांना मारली. हे पटविण्यासाठी पैसे जप्तीचे खोटे छायाचित्र त्यांना पाठविले. काही दिवस थांबा, आम्ही सुसंस्कृत कुटुंबातील लोक आहोत, पोलिसांत तक्रार करू नका, आमची बदनामी होईल, तुमचा माल परत करतो, अशा प्रकारची विनंती तो पेठे यांना करीत होता. तो सोने देण्याची तयारी दर्शवित असल्याने राणेप्रमाणे पेठे यांनीही त्याच्यावर तब्बल सहा महिने विश्वास ठेवला. पोलिसांनाही तो असे सांगत होता. शिवाय अनेक मेसेज पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी पाठविले. मात्र, तो बनवाबनवी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यास बेड्या ठोकल्या.

टॅग्स :GoldसोनंRobberyचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस