शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

औरंगाबादमध्ये लेखापरीक्षकाची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:31 PM

जालना जिल्‍हा परिषदेतील विशेष लेखापरीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंडे यांनी राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

औरंगाबाद : जालना जिल्‍हा परिषदेतील विशेष लेखापरीक्षक सुधाकर अभिमन्यू मुंडे यांनी राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. शिवाजी नगर येथे मुंडे यांच्या राहत्या घरी घडलेल्या या घटनेने या भागात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, सुधाकर मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसीपी रामेश्वर थोरात, डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्यासह पुंडलीकनगर पोलिसांनी पाहणी केली आहे. पाहणीनंतर मृतदेह शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठवला आहे.  

याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि, मुंडे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील वडवणी असून ते नोकरीनिमित्त औरंगाबादेत राहत होते. त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सकाळी मुंडे त्यांच्या राहत्या घरी खुर्चीवर बसलेले असताना त्यांनी डोक्यात मागील बाजूने गोळी झाडली व आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.