वैजापुर- येवला रोडवरील पुलाखाली स्त्री-पुरुषाचे अर्धवट जळलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:47 PM2020-02-01T18:47:09+5:302020-02-01T18:47:40+5:30

दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. 

bodies of half-burnt men and women found under the bridge at Vaijapur | वैजापुर- येवला रोडवरील पुलाखाली स्त्री-पुरुषाचे अर्धवट जळलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

वैजापुर- येवला रोडवरील पुलाखाली स्त्री-पुरुषाचे अर्धवट जळलेले मृतदेह आढळल्याने खळबळ

googlenewsNext

वैजापूर : येवला-वैजापूर रस्त्यावरील सुरेगावजवळील एका पुलाखाली महिला व पुरुष अर्धवट जळालेल मृतदेह आढळून आली आहेत. २५ ते ३० वयोगटातील तरुण तरुणीचे हे मृतदेह असल्याचा अंदाज आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेगाव येथिल लाकडी पुलाखाली महिला व पुरुषाची मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस पाटिल शब्बीर बाबु शहा फकीर यांनी येवला ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक भवारी , ए.एस. आय.तांदाळकर, पो कॉ.पगार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पुलाच्या खाली दोन मृतदेह लाकडांमध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. 
येवला तालुका हद्दीत कोणत्याही तरुण तरुणीच्या हरवल्याची अथवा निघून गेल्याची नोंद नसल्याची माहिती येवला ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. यामुळे संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या या मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांवर आहे.

Web Title: bodies of half-burnt men and women found under the bridge at Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.