शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेसाठी केला महिलेचा खून

By admin | Updated: August 22, 2014 00:59 IST

वाढवणा बु़ : माहेरच्या जमिनीचा दावा कोर्टात सुरु असताना त्यावरुन झालेल्या वादातून एका ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली़ याप्रकरणी प्रारंभी वाढवणा पोलिसांत

वाढवणा बु़ : माहेरच्या जमिनीचा दावा कोर्टात सुरु असताना त्यावरुन झालेल्या वादातून एका ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली़ याप्रकरणी प्रारंभी वाढवणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मात्र रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास मयताच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील महादाबाई एकनाथ सूरनर (वय ५०) यांचे माहेर चाकूर तालुक्यातील ब्रम्हवाडी आहे़ त्यांच्या वडिलांना दोन पत्नी होत्या़ त्यांना २४ एकर जमीन होती़ महादाबार्इंच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जमिनीवर वारसा हक्काप्रमाणे ७ जणांची नावे लावण्यात आली आहेत़ कालांतराने या जमिनीबाबत वाद सुरु झाला़ हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले़ त्याची सुनावणी २१ आॅगस्ट रोजी असतानाच निकाल विरोधात जाण्याच्या भितीने सुग्रीव कांबळे, मोहन कांबळे, धनाजी कांबळे व अन्य तिघांनी मिळून कट रचला़ २० आॅगस्ट रोजी आरोपींनी महादाबाई व त्यांचे पती एकनाथ सूरनर यांना पोस्टमास्तर बोलत असल्याची बतावणी करुन वाढवण्यात येण्यास सांगितले़ त्यानुसार हे दाम्पत्य अनुपवाडी येथून वाढवणा पाटीवर आले़ येथून एकनाथ सूरनर हे पोस्टमास्तर आले का, हे पाहण्यासाठी वाढवण्यात गेले़ याचदरम्यान, आरोपींनी महादाबार्इंना पळवून नेऊन अनुपवाडी ते वाढवणा पाटीदरम्यान खून केला, अशी तक्रार मयत महिलेचे पती एकनाथ सूरनर यांनी केली आहे़ त्यानुसार रात्री उशिरा ६ जणांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़