शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान

By admin | Updated: October 1, 2014 00:44 IST

औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते.

औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते. रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी घाटीतील शासकीय रक्तपेढीकडून सतत प्रयत्न केले जातात. वर्षभरात २०० शिबिरांच्या माध्यमातून १४ हजार ४६४ जणांनी घाटीसाठी रक्तदान केले. या दात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.घाटीत वेगवेगळ्या ३० हून अधिक वॉर्डांत बाराशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. तेथील विविध आॅपरेशन थिएटरमध्ये रोज सरासरी ४० हून अधिक मोठ्या आणि ६० ते ७० लहान शस्त्रक्रिया होतात. १० ते १२ सिझेरियन प्रसूती होतात. यातील अनेक रुग्ण असे असतात की, त्यांना रक्त द्यावेच लागते. रुग्णास वेळेत रक्तपुरवठा केला नाही तर त्याची प्रकृती धोक्यात येते. अशा परिस्थितीत तातडीने रक्ताची बॅग घेऊन येण्याचा सल्ला डॉक्टर नातेवाईकांना देतात. रक्ताची मागणी करणारे विनंतीपत्र शासकीय रक्तपेढीत नेल्यानंतर कोणताही विचार न करता रुग्णास वॉर्डातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमार्फत रक्ताची बॅग पुरविण्यात येते. रक्ताचा स्टॉक कायम ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करण्याचा सल्लाही दिला जातो. काही वेळा तर रुग्णांचे नातेवाईकही सोबत नसतात. अशा वेळी त्यास लागतील तेवढ्या रक्तबॅगचा पुरवठा करून त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर आणि रक्तपेढीतील मंडळी शर्थीचे प्रयत्न करतात. बऱ्याचदा विशिष्ट रक्तगटाचा तुटवडाही निर्माण होतो. ही परिस्थिती एप्रिल ते जून या कालावधीत दरवर्षी जाणवते. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात येते. त्या आवाहनास शहरवासीयांकडून प्रतिसादही देण्यात येतो.