शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांचा रकाना रिकामाच!

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सरकारी कार्यालयांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन ती भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय मराठवाडा विकास मंडळाने घेतला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सरकारी कार्यालयांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन ती भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय मराठवाडा विकास मंडळाने घेतला आहे. त्यासाठी विविध सरकारी कार्यालयांकडून रिक्त जागांची माहिती मागविली होती. मात्र, तीन महिन्यांनंतरही संबंधित कार्यालयांनी ही माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे मंडळाने याविषयी कार्यालय प्रमुखांना तिसऱ्यांदा पत्र पाठविले आहे.मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी १९९५ साली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून हे मंडळ विविध क्षेत्रातील मागासपणा शोधून तो दूर करण्यासाठी शासनाला शिफारशी करण्याचे काम करीत आहे. तसेच मंडळाला स्वत: काही कामे करण्यासाठीही दरवर्षी निधी दिला जात आहे. सध्या मंडळाचे अध्यक्षपद रिक्त असून, त्याचा कार्यभार विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आलेला आहे. मंडळावरील इतर सदस्य मात्र, कार्यरत आहेत. त्यामुळे मंडळाच्या नियमित बैठका होत असून, त्यात मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा होऊन शासनाला अहवाल सादर केला जात आहे. सरकारी कार्यालयांतील रिक्त पदांमुळे मराठवाड्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचे मंडळाच्या याआधीच्या बैठकीत काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मंडळाने आरोग्य, जलसंधारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अशा विविध सरकारी कार्यालयांकडून रिक्त जागांची माहिती मागविली. त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. मात्र, तीन महिन्यांनंतरही संबंधित कार्यालयांनी ही माहिती सादर केलेली नाही. आतापर्यंत दोन वेळा कार्यालय प्रमुखांना याविषयी मंडळाने पत्र पाठविले आहे. तरीही माहिती न आल्यामुळे आता तिसऱ्यांदा पत्र पाठविले असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.विकास मंडळाची बुधवारी बैठकमराठवाडा विकास मंडळाच्या कार्यकारिणीची सर्वसाधारण बैठक २३ जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी मंडळाच्या विविध उपसमित्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विषयानुसार मंडळाने एकूण १० उपसमित्या स्थापन केलेल्या आहेत. यामध्ये कृषी, पीक संवर्धन- फलोद्यान, उद्योग व ऊर्जा, पाटबंधारे, महिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वाहतूक, दळणवळण, ग्रामीण विकास, समाजकल्याण, सहकार, पशुसंवर्धन आदी विषयांवरील समित्यांचा समावेश आहे. या सर्व समित्यांच्या नुकत्याच बैठका झाल्या असून, त्यातून सर्वसाधारण बैठकीसमोरील विषयपत्रिका तयार करण्यात आली आहे.