शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

तीर्थपुरी : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर महाराष्ट्र विकण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना तुम्ही निवडून देणार का,

तीर्थपुरी : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर महाराष्ट्र विकण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना तुम्ही निवडून देणार का, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला व उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ मंगळवारी तीर्थपुरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संतोष सांबरे, माजी आमदार अण्णासाहेब उढाण, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, सतीश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे पुढे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान मोदी पंढरपूरच्या सभेत म्हणतात, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. तोच अर्ध्या तासात लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी म्हणतात, वेगळा विदर्भ करू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर मोठे घोटाळे करून महाराष्ट्र विकायचाच प्रयत्न सुरू केल्याची टीका त्यांनी केली. शिवछत्रपतींच्या नावाने भाजप मत मागतात. लहान मुले विचारतात, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, मग ते पुन्हा मुख्यमंत्री कसे होणार. राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला.राज्याची सत्ता शिवसेनेच्या हातात द्या, मग अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखवू. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठिवरील ओझे कमी करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुखांचे होते, तेही पूर्ण करू. शेतकरी, महिला, युवकांचे प्रश्न सोडवू, असेही ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षात घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपेंनी काय केले? असा सवाल करून ठाकरे म्हणाले, एक्स्प्रेस कालव्याची व रस्त्यांची कामे झाली का, ५२ गावातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही. यावेळी रणजितसिंह उढाण, डॉ. राजन उढाण, भाऊसाहेब पाऊलबुधे, हरीहर शिंदे, श्रीकृष्ण बोबडे, बाबासाहेब इंगळे, जगन काकडे, भास्कर मगरे, शिवाजी शिवतारे आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. कीर्ती उढाण व त्यांचे पती जि.प. सदस्य श्यामनाना उढाण यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी उढाण दाम्पत्याचे पुष्पहाराने स्वागत केले. (वार्ताहर)