Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:04 IST2023-10-30T16:04:15+5:302023-10-30T16:04:47+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले कार्यालयात तोडफोड

Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले
गंगापूर : आरक्षणासाठी तालुक्यातील मराठा आंदोलक सोमवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार विरोधी घोषणाबाजी देत दुपारी अडीज वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले.
एसबीआय बँकच्यावर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंब यांच्या कार्यालयात आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील बोर्ड, खुर्च्या, टेबल तोडण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाचे शहरातील बॅनर फाडून ते जाळले. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.
गंगापूरमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले#MarathaReservationpic.twitter.com/SHpNHKpFYS
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 30, 2023