छत्रपती संभाजीनगर : भाजपने महापालिकेत जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. मनपा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता जि. प. निवडणुकीत देखील तोच पॅटर्न राबवण्याचा पक्षाचा मानस आहे. या निवडणुकीतही भाजपची शिंदेसेना व इतर मित्रपक्षांसोबत युती होण्याबाबत भाजप नेत्यांनी साशंकता व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे ६३ गट आहेत. २०१७ साली भाजपच्या २३ जागा निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत पक्षाला पूर्ण बहुमत मिळून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला जि. प. अध्यक्ष भाजपचाच करण्याचा निर्धार ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. आ. संजय केणेकर यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. २१ तारखेच्या आत उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी ग्रामीण जिल्हा प्रमुखांची काय तयारी आहे, हे मंत्री सावे यांनी समजून घेतले.
पुढील तीन दिवसात उमेदवारी निश्चित होण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू राहणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, मनपात निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंत्री सावे यांची रविवारी भेट घेतली. सावे यांनी नगरसेवकांचे पेढा भरवून अभिनंदन केले.
Web Summary : After municipal success, BJP aims for Zilla Parishad control in Aurangabad, potentially solo. Alliance with Shinde Sena uncertain. Minister Save strategizes for victory, targeting majority in 63 seats. Candidate selection soon.
Web Summary : नगरपालिका सफलता के बाद, भाजपा का लक्ष्य औरंगाबाद में जिला परिषद नियंत्रण है, संभवतः अकेले। शिंदे सेना के साथ गठबंधन अनिश्चित है। मंत्री सावे 63 सीटों में बहुमत हासिल करने के लिए रणनीति बना रहे हैं। उम्मीदवार चयन जल्द।