शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने चालविली शेतकºयांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:45 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया भाजपच्या काळात अजूनही शेतकरी, व्यापारी, कर्मचारी कोणीच सुखावला नाही. सगळ्यांचेच सारखे हाल आहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली तर आमची खिल्ली उडविली. आता त्यात वारंवार नवे आदेश काढून शेतकºयांचीही चेष्टा केली जात आहे, असा आरोप आ.रामराव वडकुते यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया भाजपच्या काळात अजूनही शेतकरी, व्यापारी, कर्मचारी कोणीच सुखावला नाही. सगळ्यांचेच सारखे हाल आहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली तर आमची खिल्ली उडविली. आता त्यात वारंवार नवे आदेश काढून शेतकºयांचीही चेष्टा केली जात आहे, असा आरोप आ.रामराव वडकुते यांनी केला.वडकुते म्हणाले, आगामी काळात शेतकºयांच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे केले जाणार आहे. शेतकºयांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. आत्महत्या थांबल्या नाहीत. कधी नव्हे, तो शेतकºयांनी संप केला. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागण्या तर मान्य केल्याच नाहीत, उलट त्यांच्यात फूट पाडण्याची खेळी केली. शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, पाठीशी आहे, असा शब्दप्रयोग करायचा अन् त्या दिशेने पावले उचलायची नाही, असेच सगळे चालले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा, शेतकरी समन्वय समितीच्या आंदोलनानंतर कर्जमाफी दिली. त्यात सतराशे अटी घातल्या. शिवाय रोज नवनवे आदेश काढत आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना तर उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय लाभ नाही. एवढे करूनही कर्जमाफी देण्याची मानसिकताच नसल्याने चक्क शेतकºयांनाच बोगस ठरविण्याची मजल भाजपवाल्यांनी मारली आहे. पात्र, अपात्र न म्हणता असा शब्दप्रयोग म्हणजे सत्तेचा माज चढल्याचे दिसून येत आहे. कोणी शेतकºयांना साले म्हणतो, कोणी प्रेमप्रकरणातून आत्महत्या वाढल्या म्हणतो. असे अनेक विषय करून शेतकºयांची चेष्टाच केली जात आहे.भरपावसाळ्यात ९ तासांचे भारनियमन होत आहे. शिवाय अव्वाच्या सव्वा देयके दिली जातात. शेतकºयांना डीपी, खांब आदी साहित्यासाठी पैसे मोजावे लागतात. वाहतूक खर्च अधिकारीच उचलून खातात. तीन-तीन महिने डीपी मिळत नाही. आॅईल खरेदी करायला यांच्याकडे पैसे नाहीत. वीजच नसेल तर शेतकरी समृद्ध कसा होईल? जलयुक्त तर नावालाच आहे. त्यात कुठेच पाणी साचले नाही. शिवाय एका गावातील १00 टक्के कामे करून दुसरे निवडायला पाहिजे होते. तसे न करताच दुसºयाची निवड केली जाते. मग्रारोहयोतील विहिरी तर दिवास्वप्न आहेत. राज्यभर नुसता गवगवा आहे. हिंगोलीतही दहा हजारांची घोषणा अन् दहाही झाल्या नाहीत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीएसटीमुळे सामान्यांचाच खिसा कापला जात आहे. तर कर भरण्यासाठी व्यापाºयांनाही सुलभ प्रणाली दिली नाही. सर्वांनाच चोर समजण्याच्या भाजपच्या या वृत्तीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काळा पैसा, नोटबंदी फसली अन् काँग्रेसच्या काळातील जनहिताच्या काही योजना वगळता इतर कोणत्याच योजनांना निधी नाही. नव्या योजनाही नाहीत. स्वच्छ भारत, योग दिन, फूटबॉल सामने असे उत्सवी कार्यक्रम घेवून लोकांना गुरफटून ठेवण्याचे काम मात्र सुरू आहे. त्यामुळे सामान्यांचा या सरकारवरील विश्वास उडाला. यांना सत्तेची संधी देऊन तीन वर्षांचा काळ उलटला. तरीही काहीच दिसत नसल्याने आता उद्रेक होतोय. सामान्यांना खरोखर ‘अच्छे दिन’ यावेत, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन उभारणार असल्याचेही वडकुते म्हणाले. यावेळी वडकुते यांच्यासमवेत जि.प.सदस्य मनीष आखरे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, नगरसेवक आमेर अली उपस्थित होते.