शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

चाव्या,शिक्के बीडीओंकडे

By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST

नांदेड :वेतनातील तफावत दूर करून पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातही वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन सुरू केले आहे़

नांदेड : ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या वेतनातील तफावत दूर करून पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातही वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी राज्य ग्रामसेवक युनियनने आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनांतर्गत बुधवारी जिल्ह्यातील ६०० हून अधिक ग्रामपंचायतीच्या चाव्या आणि शिक्के बीडीओंकडे जमा करण्यात आले आहेत़ग्रामसेवक युनियनने या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनांतर्गत ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवकांनी मोर्चा काढला़ तर १ जुलै रोजी दैनंदिन काम केले़ तर बुधवारी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी आपल्याकडील ग्रामपंचायतींच्या चाव्या व शिक्के बीडीओंकडे जमा केले़ राज्यशसनाच्या १३८ योजनेचे काम ग्रामसेवक करत आहेत़ अनेक योजनांमध्ये देशात महाराष्ट्र सतत प्रथम क्रमांकावर राहिले आहे़ असे असताना ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय मागण्याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे़ शासनाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन संघटनेला वारंवार दिले होते़ मात्र ते पूर्ण केले नाही़ त्यामुळे युनियनने आंदोलन छेडले आहे़ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे कालबध्द पदोन्नततीमध्ये आर्थिक लाभ मिळत नसल्याने ग्रामसेवक संवर्गात तीव्र नाराजगी पसरली आहे़ ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या आंदोलनांतर्गत २ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्या़ आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर ग्रामसेवक विभागनिहाय धरणे आंदोलन करणार आहेत़ त्यात औरंगाबाद विभागातील ग्रामसेवक १४ व १५ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे विभागीय अध्यक्ष एऩ डी़ कदम यांनी सांगितले़ १६ जुलैपासून बेमूदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ ग्रामसेवकांचे हे आंदोलन यशस्वी करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे सचिव पी़जे़ नागेश्वर, कोषाध्यक्ष बी़डी़ बुच्चे, मानद अध्यक्ष श्यामराव मुत्यालवार, कार्याध्यक्ष आनंद शेळके, उपाध्यक्ष जे़डी़ वनसागरे, सय्यद नजीर, स्वप्नाली चव्हाण, यु़बी़ नाईक आदींनी सांगितले़ (प्रतिनिधी)आंदोलनाच्या तीव्रतेबाबत प्रशासन अनभिज्ञचजिल्ह्यात ग्रामसेवक युनियनने आंदोलन केले असले तरी या आंदोलनाचा विशेष परिणाम जाणवला नसल्याचे जि़प़च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ ए़ कोमवाड यांनी सांगितले़धर्माबाद तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी चाव्या दिल्या असल्याचे सांगताना इतर तालुक्यातील आंदोलनाच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली जात असल्याचे ते म्हणाले़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचा पदभार सोपविला जाणार आहे़याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनीही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले़ राज्य ग्रामसेवक संघ संपात नाहीजिल्ह्यात राज्य ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या आंदोलनात राज्य ग्रामसेवक संघ सहभागी नसल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे़ ग्रामसेवक संघाचे सर्व सभासद आपआपल्या सज्जावर कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष संजय मिरजकर, कार्याध्यक्ष आऱबी़ साळवे, सरचिटणीस डी़एस़ कुरूंदे यांनी सांगितले़