शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीत ‘हाफ डे’ शाळा

By admin | Updated: July 6, 2014 00:13 IST

राजेश गंगमवार, बिलोली सद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे.

राजेश गंगमवार, बिलोलीसद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे. परिणामी बिलोली तालुक्यातील खाजगी शाळांनी मार्चप्रमाणे ‘हाफ डे’ शाळांचा प्रयोग सुरु केला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वच स्तरात फटका बसला असून शेतकरी देखील हैराण झाला आहेत. दरम्यान, खाजगी शाळा संस्थेमार्फत निर्णय घेत असून जिल्हा परिषदांच्या शाळा मात्र वरिष्ठांकडे पाहत आहेत. जुलैचा पहिला आठवडा संपत आला पण पावसाची अद्याप चिन्हे नाहीत. उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले आहे. दिवस-रात्र वारे सुटत असून आकाशातही ढगाळ वातावरण नाही. वाढत्या तापमानामुळे अद्यापही उन्हाळ्याप्रमाणे घराघरात वॉटर कुलर दिसून येत आहे. घरातही थांबणे अवघड होऊन बसले आहे. इकडे शाळांमध्येदेखील हिच स्थिती असून ५० ते ६० विद्यार्थी असलेल्या वर्गावर्गात उकाड्याने विद्यार्थी वैतागले आहेत. जूनअखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैपासून शिकवणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शिक्षक मंडळी शिकवणी करीत असले तरी उकाडा व गारपिटीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागत नाही. परिणामी विद्यार्थी हजेरीवरदेखील परिणाम झाला आहे. यापूर्वी पावसाळा लांबला की उन्हाळी सुट्या वाढत होत्या. पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने एकच दिवस हजेरी लावली. परिणामी सुट्या वाढवण्याचा प्रश्नच पुढे आला नाही. मात्र मागच्या वीस दिवसांत एकही थेंब पाऊस झाला नाही. उलट उन्हाळ्याप्रमाणे उकाड्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी शाळांवरदेखील परिणाम झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच आरटीईच्या कायद्यान्वये भौतिक सुविधा देणे आवश्यक असल्याने बहुसंख्य शाळांनी छताचे पंखे बसविण्यास सुरुवात केली. संस्थाचालकांनीही पुढाकार घेऊन वर्गावर्गात पंखे आणले पण आता भारनियमन वाढल्याने पंखे असूनही उपयोग होत नाही. असे चित्र समोर आहे. पावसाअभावी चिंतेचे वातावरण आहे.जि. प. शाळांना परवानगी द्यावीवाढलेल्या तापमानामुळे चांगलाच उकाडा होत आहे. खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये गावातूनच पाणीपुरवठा होतो. पण बहुसंख्य गावांत पाणीटंचाई झाल्याने मुलांना पाणी वेळेवर मिळत नाही. पाऊस नाही, वाढते तापमान यामुळे विद्यार्थी वर्गात बसणे अवघड झाले आहे.परिणामी जि. प. शाळांनीही ‘हाफ डे’ करावे. व्यंकटेश भोगाजे (बिलोली तालुकाध्यक्ष, अ. भा. प्रा. शिक्षक संघ).तापमानात वाढ झाली आहे. पावसाळा उन्हाळ्याप्रमाणे जाणवत आहे हे वास्तव आहे. संस्थाचालक व शालेय समिती आपल्यास्तरावर हिताचा निर्णय घेऊ शकतात. परिस्थितीनुसार ‘हाफ डे’ करता येईल पण जि. प. चे निर्णय जिल्हा पातळीवरुन ठरतात.माधव सलगरगटशिक्षणाधिकारी, बिलोली