शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीत अन्न सुरक्षा योजना गोत्यात

By admin | Updated: June 20, 2014 00:10 IST

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़ शासकीय गोदामात पुरवठा होणाऱ्या ट्रान्सपोर्ट ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे़ तालुक्यात शासकीय नोंदीनुसार ९३ हजार २०३ लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होतो़ प्रत्यक्षात पुरवठा विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ९८ हजार ९६६ लाभार्थी आहेत़जिल्हा व तालुका प्रशासनात ताळमेळ जमला नसल्याने मागच्या सहा महिन्यापासून ५ हजार ३६३ लाभार्थीचा कोटा कमी येत आहे़ अशा परिस्थितीत लाभार्थींना माल कमी देण्यात येत आहे़ निवडणूक पूर्व फेब्रुवारी महिन्यात अन्न सुरक्षा योजना अंमलात आली़ प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येते, पण साडेपाच हजार लाभार्थींचा आकडेवारीत घोळ झाला आहे़आता मागच्या तीन महिन्यांपासून गोदामात २ हजार ७०५ क्विंटल तांदळापैकी केवळ बाराशे क्विंटल माल आला आणि १८९० क्विंटलपैकी केवळ ४१० क्विंटल गहू आला़ दरम्यान केशरी कार्डधारकांचा पुरवठा पूर्णत: बंद आहे़ पुरवठा वेळेवर होत नसल्याने लाभार्थी दुकान दाराकडे हेलपाटे मारत आहेत़ शासनाकडून दरमहा पुरवठा होताना बिलोलीत वेळेवर व कमी पुरवठा झाल्याने लाभार्थी वैतागले आहेत़(वार्ताहर)