Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगर महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ऐनवेळी उद्धवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:02 IST2026-02-10T10:58:42+5:302026-02-10T11:02:23+5:30
Chhatrapati Sambhajinagar Mayor News: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत असतानाच राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धवसेनेने ऐनवेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगर महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ऐनवेळी उद्धवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत उद्धवसेनेने आपली भूमिका जाहीर केली. ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत कोणालाही मतदान करणार नसून तटस्थ राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, अशी माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली.
अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ नगरसेवक आहेत. पक्षाच्या आदेशानुसार, आमचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणार असले तरी ते कोणालाही मतदान करणार नाहीत. आम्ही तटस्थ राहून या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहोत. महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेसेनाविरुद्ध महाविकास आघाडीतील इतर पक्ष अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही ठाकरे गटाने घेतलेल्या या वेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एकूण ११५ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ५७ जागा जिंकल्या आहेत. तर, तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने १३ जागांवर यश मिळवले. दुसरीकडे, ३३ जागा जिंकून 'इतर' आणि अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपने ५७ जागा जिंकून बहुमताच्या अगदी जवळ मजल मारली आहे. शिंदेसेनेच्या १३ जागांच्या साथीने महायुतीकडे आता ७० जागांचे स्पष्ट संख्याबळ झाले आहे.