मोठा दिलासा! इच्छुक उमेदवारांनो इकडे लक्ष द्या, रविवारीही अर्ज स्वीकृती राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:31 IST2025-11-15T19:30:32+5:302025-11-15T19:31:34+5:30
१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

मोठा दिलासा! इच्छुक उमेदवारांनो इकडे लक्ष द्या, रविवारीही अर्ज स्वीकृती राहणार
गंगापूर : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी गंगापूरवगळता इतर ठिकाणी अर्जांचा पाऊस पडला. शुक्रवारअखेर सहा नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी मिळून एकूण ९६ तर नगराध्यक्षपदासाठी ११ अर्ज दाखल झाले.
१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यात संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री दिलेल्या निर्देशांनुसार, रविवारी (दि.१६) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान अर्ज स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हातात ३ दिवस उरले. रविवारीदेखील उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा अर्ज दाखल करता येणार आहेत.
पालिकानिहाय दाखल अर्ज
पालिका सदस्य अध्यक्ष
गंगापूर ०० ००
वैजापूर ३५ ०२
सिल्लोड १० ०१
कन्नड १९ ०२
खुलताबाद ०३ ०२
फुलंब्री(न.पं.) ०४ ०३