मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:21 IST2025-11-28T18:19:21+5:302025-11-28T18:21:14+5:30

अधिसूचनेत २९२८ मालमत्ताधारकांची नावे; मुळात जमीन लागणार केवळ २० ते २२ हेक्टर

Big news! Railway doubling notification scares 2928 property owners in Chhatrapati Sambhajinagar | मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले

मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले

- विकास राऊत / श्रीकांत पोफळे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते परभणीपर्यंत सुमारे १७७ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २० गावांतील सुमारे २१ ते २२ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवारी अधिसूचना जारी केली. अधिसूचनेत जवळपास १४४ च्या आसपास गट व सर्व्हेमधील २९२८ मालमत्ताधारकांची नावे आल्यामुळे आपली मालमत्ता रेल्वेमार्ग रुंदीकरणात जाणार की काय, या भीतीने नागरिक धास्तावले आहेत. त्यांनी आज दिवसभर जायकवाडी प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात फोन करून अनेकांनी भंडावून सोडले. तर, दुसरीकडे या भूसंपादनावर राजकीय नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शहरातून रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडीदरम्यान १२५ च्या आसपास गृहनिर्माण संस्था व नागरिकांची घरे आहेत. त्यांच्यात जास्त संभ्रमाचे वातावरण आहे. नागरिकांनी यासाठी संघर्ष समितीदेखील गठित केली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्याऱ्यांचे स्पष्टीकरण असे...
भूसंपादन कायदा २० (अ) प्रमाणे प्राथमिक अधिसूचना काढली आहे. रेल्वेच्या एका लाइनसाठी अधिग्रहण होणार आहे. १५ ते २० मीटरपर्यंतची जागा विद्यमान लाइनपासून संपादित होईल. जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत ते भूसंपादन आहे. अधिसूचनेत जेवढ्या मालमत्ताधारकांची नावे आली, त्या सगळ्यांची जमीन जाणार नाही. भूसंपादन होणार, हे कळविण्यासाठी सर्वांची नावे अधिसूचनेत दिली आहेत.  जिल्ह्यातील हद्दीतील जेवढे गट, सर्व्हे क्रमांक त्या २५३९ मालमत्ताधारकांची नावे अधिसूचनेत आली आहेत. ३५० हेक्टर क्षेत्र अधिसूचनेत असले तरी त्यात २० ते २२ हेक्टर जाग संपादित होईल. मोजणी झाल्यानंतर कुणाची किती जमीन जाते हे स्पष्ट होईल, असे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन जायकवाडी प्रकल्प) एकनाथ बंगाळे यांनी सांगितले.

भूसंपादनप्रकरणी सामूहिक हरकती
जिल्हा प्रशासनाची हद्दीतील शेकटापर्यंत २१ ते २२ हेक्टरचे भूसंपादन होणार आहे. प्रक्रियेबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी करणाऱ्या सामूहिक हरकती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्याकडे गुरुवारी आल्या. भूसंपादन प्रक्रिये अपूर्ण व चुकीची माहिती, नकाशातही स्पष्टता नाही. पर्यायी मार्गाचा अभ्यास नाही, या हरकती डॉ. प्रशांत अवसरमल, गणेश पालवे, नीलेश लोखंडे यांनी घेतल्या.

सार्वजनिक चर्चा करावी
रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने मालमत्ताबाधितांसोबत चर्चा करून संपूर्ण भूसंपादनाबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती द्यावी; तसेच संभाव्य प्रभावित नागरिकांसाठी सार्वजनिक चर्चा आयोजित करावी.
- अर्जुन सोळुंके (प्रभावित नागरिक, करमाड)

गाव-गट/सर्व्हे क्रमांक- भूसंपादन (हेक्टरमध्ये) - मालमत्ता धारक

सातारा- ११९- ०.१७०- ४०

सातारा : २- १२८, १४१- ०.२३०५- ३६०

कुंभेफळ- ३९, ४४, २१९, २२१- ०.१३९३- ३२३

लाडगाव- ७- १६६, १६९, २, १७०,१७१, १७२- ०,३४००- ६७

शहानूरवाडी- २१, २६, २९, ३०/१/२,४६- ०.०८९४- ३१८

मुस्तफाबाद- विविध सर्व्हेमधील ३१ प्लॉट्स- ०.०२७९- १७१

शेकटा- ६, ८, १२, ३६, ४४, ३७, ४१- २.०४२२- ५४०

शेंद्रा जहाँगीर- १०६, १०५, १०३/१,१०३/२, १४६, १६०, १६१- २.१७८९- ४७८

हसनाबादवाडी- १३५, १३९, १४०, १४१, १४२, १९३, १९४, १९५, २०१, २०२, २०३, १६४, १६५/१,१६५/२-  २.१९०९- ७६

चिकलठाणा द.- ५७९, ५८०- ०.४५९८- ०८

मुर्तुजापूर- १३/१,१३/२,१३/३,१३/४, १४.१२.११- ०.४५४३- ७६

करमाड- ५, ७, ५८, ८१, ८२, १२२, १३१, २३८, १२- २.५५७५- १८१

फत्तेपूर- १७, २१- ०.५४५१- ६०- मुकुंदवाडी- ५७/१,५७/२- २.२०४२- १०

गारखेडा- ३०, ३१, ३८, ३९- १.४६३६- १२

करंजगाव- १४८, १४९- ०.४२५८- ११

गाढेजळगाव- २९५, २९६/१/२, ३०४/१/२, ३०५, ६, ७, ८, ३४९, ३५२, ३५५, ३७८- १.८३५३- ६५

चिकलठाणा- ४२८, ४२९, ४३९, ४४१, ४२, ४३, ४४, ४५०, ४५९/१/२, ४६३, ४६२/१/२,४६४/१/२, ४८२, ४८६, ४९५, ४९६, ५१९, ५२०, ५२१, ५३३/२, ५३४/२- २.३९४४- ८९

वरूडकाझी- २३८- ०.३१९७- ०९

देमणी- ३६, ३७, ४४, ४५, ४६, ४७, ६०, ६३, ४३- १.७६५६- ३४

Web Title : रेलवे दोहरीकरण में तेजी; अधिसूचना से 2928 संपत्ति मालिक चिंतित।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर-परभणी रेलवे दोहरीकरण के लिए भूमि अधिग्रहण की आवश्यकता है, जिससे अधिसूचना में नामित 2928 संपत्ति मालिक चिंतित हैं। अधिकारियों ने स्पष्ट किया कि 350 हेक्टेयर भूमि अधिसूचना के तहत है, लेकिन केवल 20-22 हेक्टेयर का अधिग्रहण किया जाएगा। प्रभावित नागरिक प्रक्रिया के बारे में पारदर्शी जानकारी और सार्वजनिक चर्चा की मांग करते हुए चिंता व्यक्त करते हैं।

Web Title : Railway Doubling Speeds Up; Notification Worries 2928 Property Owners.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway doubling requires land acquisition, causing anxiety among 2928 property owners named in the notification. While 350 hectares are under notification, only 20-22 hectares will be acquired, clarified officials. Affected citizens express concerns demanding transparent information and public discussion regarding the process.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.