मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

By विकास राऊत | Published: December 1, 2023 06:24 PM2023-12-01T18:24:15+5:302023-12-01T18:25:25+5:30

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत उड्डाणपुलाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली.

Big news! After Nitin Gadkari's refusal, DCM Devendra Fadnavis gave the order for the continuous flyover work | मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा ते वाळूज उड्डाणपूल बांधण्याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर महिन्यात साशंकता व्यक्त केल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत या पुलाच्या कामाबाबत गुरुवारी चिंतन करण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलार, डी.एम.आय.सी.मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रिज या कामाचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या विकासकामांना गती द्यावी, अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पैठण येथील जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (एनटीपीसीचे) महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येईल. पक्षी अभयारण्य आणि पर्यावरण याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करून पर्यावरण, स्थानिक पातळीवरील अडचणी पक्षी अभयारण्य आरक्षण याबाबत खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण करून घ्यावे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवावा. त्यानंतर हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. याबाबतच्या पर्यावरण विषयक परवानगी संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालय सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, एनटीपीसीचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव साळुंके, सचिव अमित मीना आदींची उपस्थिती होती.

उड्डाणपुलाबाबत घेतला आढावा
शहराचा सध्या होत असलेला विस्तार, वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जालना रोडवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत उड्डाणपुलाबाबत फडणवीसांनी माहिती घेतली. पुलासह चर्चेला असलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

Web Title: Big news! After Nitin Gadkari's refusal, DCM Devendra Fadnavis gave the order for the continuous flyover work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.