शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षअखेरीस आॅरिकमध्ये येणार मोठा उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:59 IST

सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरत्या वर्षअखेरपर्यंत औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिपमध्ये (आॅरिक) मोठा उद्योग येणार असल्याचा दावा दिल्ली, मुंबई, इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.येणारा उद्योग आॅटो, इलेक्ट्रिक, फूड अथवा अन्य उत्पादन क्षेत्राशी निगडित असेल; परंतु उद्योग येईल हे मात्र निश्चित, असेही त्यांनी स्पष्ट केले. किया मोटार्स का गेले हे माहिती नाही. शेवटी गुंतवणूकदारांची मर्जी असते. एलजीचा प्लांट नागपूरला जाण्यामागे पाणी हे मुख्य कारण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार नसल्यामुळे उद्योग येत नाहीत, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी केला.‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र, इन्व्हेस्ट मराठवाडा’ या औद्योगिक गुंतवणूक परिषदेसाठी ते औरंगाबदेत आले होते. यावेळी उद्योजक ऋषी बागला, डीएमआयसीचे गजानन पाटील, सीआयआयचे निनाद करपे, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, रणजित कक्कड यांची उपस्थिती होती.विक्रमकुमार म्हणाले, आॅरिक काय आहे, हे बºयाच गुंतवणूकदारांना माहिती नाही. त्यामुळे देश व विदेशात मार्केटिंगवर फोकस करण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत आॅरिकच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होईल. येणाºया वर्षभरात गुंतवणूकदारांच्या आॅरिकला भेटी वाढतील. पुणे, हरियाणा, गुडगावमध्ये आॅरिकमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने रोड शो केले. इंडस्ट्रीयल सेक्टरशी निगडित ५०० संघटना आहेत. त्यांनाही आॅरिकच्या मार्केटिंगसाठी हाताशी धरले आहे. सीबीआयएईचे २२ हजार उद्योजक सदस्य आहेत. त्याचा फायदा आॅरिकमध्ये गुंतवणुकीसाठी होईल. हनीवेल या कंपनीला १४० कोटींचे कंत्राट आॅरिकमधील आयसीटीसाठी दिले आहे. तसेच शापूर्जी अ‍ॅण्ड पालनजीकडे प्रशासकीय इमारतीचे काम करीत असून, त्यांच्याकडे अंतर्गत रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ४ वर्षांसाठी असेल, तोपर्यंत त्यांची काही रक्कम अदा करण्यात येणार नाही. हनीवेल ही कंपनीदेखील काम पूर्ण झाल्यावर ५ वर्षे देखभाल करील, असा दावा त्यांनी केला.