शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांनीच काढला काटा! जुन्या वादातून गुन्हेगाराची क्रूर हत्या; छत्रपती संभाजीनगरमध्ये टोळ्यांचा उच्छाद

By सुमित डोळे | Updated: April 22, 2026 12:15 IST

छत्रपती संभाजीनगर हादरले! गोळीबारानंतर आता टोळीयुद्धातून हत्या; रोहित उर्फ करण मस्केचा जीव घेतला.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील पुंडलिकनगर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराची शाई वाळते न वाळते तोच, गारखेडा परिसरात एका २५ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहित उर्फ करण रवी मस्के (रा. मुकुंदवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही हत्या मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास महेरसिंग नाईक महाविद्यालय परिसरात घडली.

जुन्या वादाचे रक्तरंजित पर्यावसानरोहित मंगळवारी रात्री गारखेड्यातील काही मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्यात जुन्या मारहाणीच्या कारणावरून वाद सुरू होता. रात्री पुन्हा याच मुद्द्यावरून वाद उफाळून आला आणि संतापलेल्या मित्रांनी रोहितवर चाकूने सपासप वार केले. छाती, गळा आणि पोटात खोलवर जखमा झाल्याने आणि मध्यरात्रीची वेळ असल्याने मदतीविना रोहितचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा रक्ताचा सडा उघड झाला.

पोलिसांची कारवाई आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीघटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकार आणि पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी पथकासह धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मृत रोहितवर मुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Friends Betray: Criminal Killed Over Old Feud in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A 25-year-old man, Rohit Maske, was brutally murdered by friends in Chhatrapati Sambhajinagar over an old dispute. The incident, involving stabbings, occurred near Maher Singh Naik College. Police have arrested suspects. The victim had a criminal record, raising fears of gang warfare.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर