शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.कार्यालयात लाभार्थ्यांच्या चकरा

By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST

कळमनुरी : इंदिरा आवास घरकूल योजनेचे अंतीम टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत.

कळमनुरी : इंदिरा आवास घरकूल योजनेचे अंतीम टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत. घरकुलांचे काम पूर्ण होऊनही अंतीम टप्प्याचे अनुदान मिळत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी २४ जून रोजी पंचायत समिती गाठली. पं. स. कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले. गटविकास अधिकारी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पी.आर. उबारे हे उपस्थित नसल्याने त्यांनी अनुदान तत्काळ मिळण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील ६५, जटाळवाडी येथील ५२ तर मोरवड येथील १५ लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या शेवटच्या टप्प्याचे अनुदान मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. जवळपास तीन महिन्याच्या कालावधीपासून हे अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून, घरकुलावर टाकण्यासाठी काहीही नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहे. दररोज चकरा मारूनही अंतिम अनुदान मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या लाभार्र्थ्यांना दोन टप्प्याचे म्हणजे ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले व तिसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळाले नाही. अनुदान मिळावे, यासाठी आदिवासी युवक कल्याण महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अनुदान आठ दिवसात न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर डॉ. सतीश पाचपुते, शिवप्रसाद पाचपुते, चंद्रकला काळे, तुळशीराम डाखुरे, सुभाष नाईक, हनवतराव ढाकरे, नारायण भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)तीन महिन्यांपासून लाभार्थी त्रस्त कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी येथील ६५, जटाळवाडी येथील ५२ व मोरवड येथील १५ लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत शेवटच्या टप्प्याचे अनुदान मिळत नसल्याची तक्रार. सध्या पावसाळा सुरू असल्याने घरावर टाकण्यासाठी पत्रे नसल्याने ग्रामस्थ सापडले अडचणीत. आदिवासी युवक कल्याण महासंघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन लाभार्थ्यांना अनुदान देण्याची करण्यात आली मागणी. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा.