शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो पार्किंग’ मध्येच बीडकरांची ‘पार्किंग’

By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST

बीड: शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले असून याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जात आहे

बीड: शहरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले असून याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही होत असल्याचे दिसत आहे. पार्किंग करू नये, असा दंडक असतानाही वाहनांचे पार्किंग केले तरी संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे. शहरातील सिग्नल तोडण्यातही वाहनधारक आघडीवर असून त्यांच्यावरही कारवाी केली जात नसल्याचे दिसत आहे. शहरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते आदी भागाची सोमवारी ‘लोकमत’ने पाहणी केली. यामध्ये ज्याठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड आहेत, अशा ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘नो पार्किंग’ असे फलक लावण्यात आले होते व पार्किंगसाठी स्वतंत्र जागा असलेल्या ठिकाणी दिशादर्शक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रवेश केल्यानंतर पार्किंगच्या जागेत केवळ सर्वसामान्यांची वाहने दिसून आली . कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांची वाहने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच उभी करण्यात आलेली होती. तहसील कार्यालय जेथे पार्किंग करू नये, असा फलक लावण्यात आलेला आहे, तेथेच नाकावर टिच्चून पार्किंग करण्याचा प्रकार या कार्यालयाच्या आवारात दिसून आला. जिल्हा परिषद या कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या जागेत पार्किंग न करता जिल्हा परिषदेसमोरच पार्किंग केली जात आहे तर पार्किंगची जागा जुगार खेळण्यासह गप्पा मारण्यासाठी उपयोगात येत आहे. जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा रुग्णालयात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था ढिसाळ दिसून आली. सर्वसामान्यांच्या दुचाकी गेटच्या बाहेर तर ठराविक लोकांच्या गाड्या थेट रुग्णालयाच्या ‘नो पार्किंग’मध्येच पार्किंग करण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये कर्मचार्‍यांच्याही दुचाकी होत्या. तसेच येथील पोलीस चौकीसमोर चक्क पोलिसांनीच आपल्या दुचाकी चौकीसमोर उभ्या करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. शहरातील या कार्यालयांसह मुख्य रस्त्यावरील ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. मात्र वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ही वाहने सर्रास नो पार्किंगमध्ये उभी केली जात आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे फौजदार प्रवीणकुमार बांगर म्हणाले, आमची कारवाई सुरू आहे. वाहनधारकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)